हुकूम मुलाणी
मंगळवेढा - सकाळ वृत्त सेवा :- खरीप पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यात चारा, पाणी, रोजगार, आणि जनतेच्या इतर प्रश्नावर आ.समाधान आवताडे यांनी 42 विविध शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यासमवेत 3 दिवसीय गाव भेट दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यालय प्रमुख रावसाहेब फटे यांनी दिली.
15 ते 17 सप्टेंबर या तीन दिवसात हा दौरा होणार आहे यापूर्वी तालुक्याच्या दक्षिण भागाचा दौरा केला. दौऱ्यात चारा छावणी सुरू करण्याची मागणी केली ती मागणीवर आ अवताडे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. तर शाळकरी विद्यार्थ्यांनी एसटीच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली त्या मागणीची पूर्तता देखील झाले.
याशिवाय पंचायत समिती, तहसील, महावितरण,आरोग्य, कृषी,उजनी,म्हैसाळ,पशुसंवर्धन,जि.प.बांधकाम,भूमिअभिलेख पी एम किसान योजना या विषयाच्या संदर्भात तक्रारी आल्या.त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना आपले वर्तन सुधारणा किंवा कारवाईला सामोरे जावा अशी देखील तंबी दिली त्यामध्ये बहुतांश विषय मार्गी देखील लागले खरीप पाऊस लांबल्याने नदीकाठ कोरडा पडला.
यामध्ये पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन केले नसलेले समोर आले. नदीकाठचा ऊस साऱ्यासाठी वापर अधिक झाला आहे त्यामुळे भविष्यात काय उपाययोजना कराव्यात व त्या लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी या गावाचा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात द्याव्यात असे आवाहन या करण्यात आले.
स्थानिक स्वराज्य संस्थेमधील जिल्हा परिषद ,पंचायत समिती व नगरपालिकेत लोकनियुक्त सदस्य नसल्यामुळे सगळा भार प्रशासकावर आहेत प्रशासकाकडून नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहेत त्यामुळे या लोकांच्या तक्रारी वाढत आहे त्यामुळे या तक्रारीचे निरसन करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी या नात्याने आ. समाधान आवताडे यांनी यांच्या खांद्यावर पडली.
त्यामुळे त्यांनी हा गाव भेट दौरा आयोजित केला.त्यामध्ये 15 सप्टेंबर माचनूर,ब्रह्मपुरी,मुंढेवाडी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, सिद्धापूर ,बोराळे,अरळी, नंदुर, डोणज, भालेवाडी,16 सप्टेंबर अकोले,गणेशवाडी, शेलेवाडी, आंधळगाव, लेंडवे चिंचाळे,शिरशी, गोणेवाडी,खुपसंगी,जालीहाळ,हाजापूर, डोंगरगाव, कचरेवाडी,17 सप्टेंबर बठाण,उचेठाण, मुडवी, धर्मगाव, ढवळस, शरद नगर,देगाव, घरनिकी, मारापुर,गुंजेगाव, महमदाबाद शे.लक्ष्मी दहिवडी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.