Solapur News : विद्यार्थ्यांनी बनविल्या तीन हजार गणेशमूर्ती

महापालिका, शाळा अन्‌ संघटनांचा उपक्रम
ganesh
ganesh sakal
Updated on

सोलापूर - सण, उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, यासाठी प्रशासनासह विविध संघटना प्रयत्न करत आहे. उत्सवाच्या बदलत्या स्वरूपाला आरोग्य आणि संस्कृतीची जोड देत पर्यावरणाची जनजागृती मोठ्या संख्येने होत आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, शाळा आणि विविध संघटनांच्या कार्यशाळेत शालेय विद्यार्थ्यांनी शहरात साधारण तीन हजार शाडूच्या गणेशमूर्ती तयार करीत पर्यावरण वाचविण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे.

वर्षभरात होणाऱ्या सण, उत्सवांपैकी गणेश उत्सवानिमित्त होणारे प्रदूषण हे तुलनेने अधिक आहे. गेल्या पाच वर्षात पर्यावरणपूरक उपक्रमासाठी केंद्र शासनाने माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ वायू उपक्रम आदी विविध योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

या उपक्रमामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवून जनजागृती करणे हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थिदशेतच पर्यावरणाबाबतची आस्था या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावे. या जनजागृतीसाठी महापालिका, संघटना यांनी विद्यार्थ्यांना प्राधान्य दिला आहे.

तसेच गेल्या काही वर्षांपासून शाडूच्या मातीच्या गणेशमूर्ती विक्री स्टॉलही वाढले आहेत. शाडूमातीच्या मूर्ती खरेदीकडे भाविकांचा कल वाढला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, शाळा आणि पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संघटनांनी शहरात विविध ठिकाणी कार्यशाळा घेतल्या.

ganesh
Solapur News : अंध व्यक्तीच्या वापरातील सेन्सरयुक्त पांढरी काठी लवकरच विकसित; शुभम अगरवाल यांची माहिती

या कार्यशाळेत मातीपासून गणेशमूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच सुंदर आणि सुबक मूर्ती बनविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेने बक्षीस जाहीर केले. तसेच मातीपासून बनविलेल्या मूर्तीची घरात प्रतिष्ठापना करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले जात आहे. नागरिकांची पसंती आणि पर्यावरणाची होणारी लक्षात घेऊन राबविल्या जात असलेल्या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती, श्रींची मूर्ती आकर्षक बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक रंग यामुळे होणारी पर्यावरणाची हानी. तसेच अकरा दिवस श्रद्धेने, भक्तिभावाने पूजा करून विसर्जन केल्यानंतर त्या पाण्यात न विरघळल्यामुळे होणारे विटंबना आदी सर्व गोष्टी टाळण्यासाठी पर्यावरणपूरक उत्सवाची जनजागृती प्रशासनाच्यातवीने केली जात आहे.

ganesh
Solapur News : मटका रे झटका मलई पाण्यावरची अन्‌ वाताहत सोलापूरची

बालवयातच पर्यावरणाची आस्था निर्माण व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांकडून श्रींची मूर्ती बनविण्यात आली. दिवसेंदिवस हे उपक्रम वाढत आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनजागृतीमुळे समाजामध्ये साधारण २५ टक्के बदल झाले आहे, असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

प्रत्येक शाळा, संघटना, पर्यावरणप्रेमी यांनी एकत्रित येत शाळांमध्ये एक प्रशिक्षण देण्यात आले आहे. पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्याबरोबर उत्सवाचा मुख्य उद्देश समजावून सांगताना संस्कृती, आरोग्य, अध्यात्म यांचीही माहिती दिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या शंकेचे निरसन होण्याबरोबर पर्यावरणापूरक उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे टीमवर्क आहे. विद्यार्थ्यांकडून या वर्षी किमान तीन हजार मुर्ती बनविण्यात आल्या आहेत.

प्रवीण तळे, पर्यावरणप्रेमी

ganesh
Solapur News : डेंग्यू अन्‌ चिकनगुनिया रुग्णांत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()