Solapur Politics: स्वकर्तृत्वावर पक्षाकडे विधानसभेच्या उमेदवारीची छाप

Maharashtra Poltical: निवडणुकीच्या आखाड्यात मात्र त्यांना देखील आपले कर्तृत्व आता मतदारासमोर सिद्ध करावे लागणार आहे.
Solapur Politics: Implications of Party to Assembly Candidates on Self-Employmen
Solapur Politicssakal
Updated on

सेक्शन सोलापूर

मंगळवेढा ता.1 सकाळ वृत्तसेवा :- पंढरपूर विधानसभेच्या आखाड्यात पक्षाकडे संभाव्य इच्छुक उमेदवारांनी स्वताचे कर्तुत्व पक्षनेतृत्वासमोर दाखवत उमेदवारीची छाप निर्माण करण्यात यश मिळवले असले तरी निवडणुकीच्या आखाड्यात मात्र त्यांना देखील आपले कर्तृत्व आता मतदारासमोर सिद्ध करावे लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारला यश मिळाले म्हणून महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळावी यासाठी अनेक जण इच्छुक होते त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कुणाला उमेदवारी द्यावी हा देखील प्रश्न उभा होता. यासाठी आमच्या पक्षाचे सर्वेक्षण सुरू आहे सर्वेक्षणात ज्याला पसंती त्याला उमेदवारी देऊ असे सांगत पळवाट करण्याचा प्रयत्न देखील केला. भाजपा आ. समाधान आवताडे यांनी तीन वर्षात मोठी विकास कामे केल्यामुळे पक्षात स्वतःचं अस्तित्व निर्माण केले व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अकराशे कोटीच्या विकासकामाचा शुभारंभ करताना देवेंद्र फडणवीस यांनी आ. अवताडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तन केले होते मात्र माझे कार्यकर्ते कुणाच्याही दावणीला बांधणार नाही त्यांच्यासाठी मी सक्षम आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.