Solapur Politics : कार्यक्रम तर 'करेक्ट' होणार! मात्र कोणाचा ?

सांगोल्यात विधानसभा निवडणुकी संदर्भात सोशल मीडियावर चर्चांना उदान 
solapur
solapursakal
Updated on

सांगोला - आगामी निवडणुकीचे वारे सोशल मीडियावर जोरात वाहू लागली आहे. ठीक ठिकाणच्या बैठकातून निवडणुकांच्या चर्चेबरोबरच फेसबुक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियावरही प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. सांगोला तालुक्यातील सध्या विधानसभेच्या निवडणुकीबाबतही अनेक कमेंट, व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्येच 'कार्यक्रम तर करेक्ट होणार!' मात्र कोणाचा ? याबाबत चर्चाना उदान येत आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

सांगोला तालुका हा राजकीय दृष्ट्या तसा कित्येक वर्षापासून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2019 च्या निवडणुकीची वेळी अल्पमतात का होईना शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील विजय तर झालेच परंतु गुवाहाटीमधील त्यांच्या 'काय झाडी, काय डोंगार..' या वाक्यामुळे सर्वत्र प्रसिद्धही झाले. सध्या तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात आणला गेलेला निधी, या निधीतून सुरू असणारे विविध कामे, टेंभू, म्हैसाळ, उजनी व निरा उजवा कालव्यातून मिळालेले पाणी यावर राजकीय भांडवल मोठ्या प्रमाणात केले जात आहे.

सांगोला तालुका म्हणलं की सर्व निवडणुका ह्या पाण्याभोवतीच फिरत होत्या. आजही पाण्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती कायम असल्याचे सोशल मीडियाच्या प्रतिक्रियावरून दिसून येत आहे. तालुक्यात येणारे निधी असो, पाणी असो किंवा इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर सोशल मीडियाद्वारे विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नेतेमंडळी चर्चा करीत असतात. गेल्या पन्नास वर्षाचा व सध्या पाच वर्षाचे तुलना या प्रतिक्रियातून दिसून येते.

solapur
Solapur News : तीन वेळा अपयश,नकारात्मक न होता,विद्याची जिद्दीने यशाला गवसणी

यामध्ये अनेक बाबतीत सकारात्मकतेच्या व नकारात्मकतेच्या दृष्टीनेही चर्चा होते. राजकीय कार्यकर्ते आपापल्या परीने दोन्हीबाबतीतही चर्चा करताना 'कार्यक्रम तर करेक्ट होणार !' अशीच भाषा बोलत आहे. परंतु कार्यक्रम नक्की कोणाचा होणार याबाबत स्पष्टपणे बोलत नसल्याने नक्की कार्यक्रम कोणाचा होणार याबाबत चर्चेला उदान येत आहे.

दीपक आबाही ठोकणार शड्डू ? -

सांगोला तालुक्याचे राजकारण हे पक्षनिष्ठेपेक्षा सध्या व्यक्तिनिष्ठतेवर जास्त अवलंबून असल्याचे चित्र दिसून येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी व त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांच्या बरोबरीने प्रत्येक कार्यक्रमात, निवडणुकांत बरोबरीने असणारे दीपक साळुंखे पाटील हेही विधानसभेच्या दृष्टीने विधानसभेच्या आखाड्यात उतरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. साळुंखे-पाटील आखाड्यात उतरून शड्डू ठोकत असले तरी विधानसभा निवडणुकीची खरी कुस्ती धरणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे. यावेळी आबा कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश देताना दिसत असून कार्यकर्तेही सोशल मीडियातून आबांना 'भावी आमदार' असे संबोधित आहेत.

solapur
Solapur Ganeshotsav : ‘ग्रामीण’साठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

शेकापमधील वाद चव्हाटय़ावर -

2019 ची विधानसभा लढवलेले डॉ. अनिकेत देशमुख हे पुढील शिक्षणासाठी मतदारसंघापासून दूर राहिले याच कालावधीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आपले शिक्षण व डॉक्टरकी सोडून पक्षासाठी वेळ दिला. गावोगावी जाऊन त्यांनी पक्षातील कार्यक्रमांना व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन अडचणी जाणून घेऊ लागले.

डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे पक्षातील स्व. गणपतराव देशमुख यांच्या बरोबरीने काम केलेले अनेकजण काही कारणास्तव नाराजही झाले. या नाराजी नाट्यातून त्यांनी वेगळी बैठकही घेतली. सध्या 2024 च्या आगामी विधानसभा निवडणुकीतील दोन नातूमध्ये उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित होत असतानाच पक्षामधील नाराजी नाट्यही समोर येऊ लागले आहे. परंतु पक्षातील वाढते प्रस्त, त्यांचा वाढता जनसंपर्क यामुळे डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधानसभेची निवडणूक नक्की लढतील हे सध्या तरी दिसून येत आहे.

solapur
Solapur Ganeshotsav : ‘ग्रामीण’साठी तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

नाराजांची नाराजी आमदार बापू दूर करणार का ?

आमदार शहाजी (बापू) पाटील हे आपल्या कार्यकर्त्यांच्या फळीमुळेच अनेक वर्ष विविध निवडणूका शेकापविरोधात लढत राहिले. 2019 ची निवडणूक बापू विजयी झाले, त्यांना मोठी प्रसिद्धीही मिळाली. राजकीय परिस्थितीमुळे बापूंचे स्थानही वाढले. अशा राजकीय परिस्थितीत तालुक्याच्या विकास कामांसाठी मोठा निधीही मिळू लागला.

गेल्या कित्येक वर्षापासून बापूंजवळ राहिलेले अनेक कार्यकर्ते काही कारणामुळे बापुंपासून दुरावू लागले. या नाराज कार्यकर्त्यांचा फटका आगामी निवडणुका होऊ नये म्हणून आपल्या कट्टर नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार का याकडे लक्ष लागले आहे. सत्ता असतानाही कार्यकर्ते का दुरावू लागले याचा शोध काही बापूंजवळील नेतेमंडळी सध्या घेऊ लागले आहेत.

मोदींची लाट, भाजप सुसाट

सांगोल्यात शेकापचे देशमुख घराणे, आमदार शहाजी पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्याभोवती सांगोल्याचे राजकारण फिरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षापासून देशात सुरू असणारे मोदींच्या लाटेमुळे भाजपच्या पक्षांतर्गत नवनवीन विविध उपक्रमामुळे, त्यांच्या स्वतःच्या पक्षातील होणाऱ्या कार्यक्रमांमुळे तालुक्यात भाजपची लाट सध्या सुसाट असल्याचे दिसून येत आहे. तालुकाध्यक्षपदावरून थेट ग्रामीण जिल्हाध्यक्ष झालेले चेतनसिंह केदार-सावंत हे विधानसभेच्या पक्षीय राजकारणापासून दूर असले तरी पक्षवाढीसाठी, पक्ष कार्यक्रमांनाच सध्यातरी ते प्राधान्यक्रम देताना दिसून येत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.