Solapur :सर्वसामान्यांना मोठा दिलासा! महागाईने गाठला दोन वर्षांतील तळ

मे महिन्यात ग्राहक अन्न किंमत निर्देशांक एप्रिलमधील ३.८४ टक्क्यांवरून मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर आला आहे. तर भाजीपाला महागाईचा दर ८.१ टक्क्यांनी कमी झाला आहे.
mahagai.
mahagai.sakal
Updated on

Solapur- देशातील किरकोळ महागाई दराने मे महिन्यात गेल्या २५ महिन्यांतील नीचांक गाठला आहे. एप्रिलमधील ४.७० टक्क्यांच्या तुलनेत हा दर ४.२५ टक्क्यांवर आला आहे. सांख्यिकी मंत्रालयाने आज ही आकडेवारी जाहीर केली.

अन्नधान्य, डाळी, भाजीपाला आणि इंधन सर्वांच्याच दरात घसरण झाल्याने महागाईचा दर खूपच कमी झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ऑक्टोबर २०२१ नंतरचा हा सर्वांत कमी दर आहे.

mahagai.
Pune Fire News: मार्केटयार्डात मध्यरात्री पुन्हा भीषण आग; दोन कामगारांचा होरपळून मृत्यू

एलपीजी आणि केरोसीनच्या दरातील आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीने मे महिन्यातील महागाईचा दर कमी होण्यास मोठा हातभार लावला आहे.

सलग चौथ्या महिन्यात किरकोळ महागाईत घसरण झाली असून, ग्राहक-किंमत निर्देशांक (सीपीआय) आधारित किरकोळ महागाई दर सलग तिसऱ्या महिन्यात रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षित मर्यादेच्या दोन ते सहा टक्क्यांच्या आत राहिला आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

mahagai.
Karad Crime : कॉलेजच्या पाठीमागं सापडला सडलेला मानवी सांगाडा; राजमाचीत खळबळ, फॉरेन्सिक टिमकडून पाहणी

मे महिन्यात ग्राहक अन्न किंमत निर्देशांक एप्रिलमधील ३.८४ टक्क्यांवरून मे महिन्यात २.९१ टक्क्यांवर आला आहे. तर भाजीपाला महागाईचा दर ८.१ टक्क्यांनी कमी झाला आहे.

खाद्यपदार्थ, शीतपेये आणि इंधन दर अनुक्रमे ३.२९ टक्के आणि ४.६४ टक्के असून, तृणधान्यांच्या महागाईचा दर एप्रिलमधील १३.६७ टक्क्यांच्या तुलनेत १२.६५ टक्क्यांवर आला आहे. ग्रामीण महागाई ४.१७ टक्के, तर शहरी महागाई ४.२७ टक्के आहे.

mahagai.
Mumbai News : मुंबईत वादळाच्या तडाक्याने ५० झाडे कोसळली; सहा जण जखमी

देशातील किरकोळ महागाईचा दर सलग तीन तिमाहीत रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या लक्ष्यापेक्षा जास्त होता आणि फक्त नोव्हेंबर २०२२ मध्ये महागाईचा दर मर्यादित टप्प्यात होता. रॉयटर्सच्या ४५ अर्थशास्त्रज्ञांच्या सर्वेक्षणात एप्रिलमधील ४.७० टक्क्यांवरून महागाईचा दर मे महिन्यात ४.४२ टक्क्यांवर येण्याचा अंदाज वर्तवला होता.

शेतीवर अवलंबून असलेल्या भारतात उष्णतेची तीव्रता वाढत असूनही, कमी उत्पादन खर्च आणि किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारच्या नियमित हस्तक्षेपामुळे महागाईत अपेक्षित घट दिसून आली आहे, असे रॉयटर्सने म्हटले आहे.

mahagai.
Pune Zp School : झेडपी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार एकच गणवेश आणि पहिली तीन महिने एकच पुस्तक

रिझर्व्ह बँकेने आठ जून रोजी संपलेल्या आपल्या अलीकडील चलनविषयक धोरण बैठकीत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी महागाईचा सुधारित अंदाज जाहीर केला. पुरवठ्यीतील कपातीमुळे खाद्यपदार्थ आणि वस्तूंच्या किमतींमध्ये वाढीचा धोका असल्याने आर्थिक वर्षातील महागाई दर चार टक्क्यांच्या वर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आरबीआयने महागाईचे उद्दिष्ट एप्रिलच्या धोरणातील ५.२ टक्क्यांवरून ५.१ टक्क्यांवर आणले होते. भारतातील औद्योगिक उत्पादनाचा निर्देशांक एप्रिल महिन्यात वार्षिक आधारावर 4.2 टक्क्यांनी वाढला आहे, जो मार्चमध्ये 1.1 टक्के आणि एप्रिल 2022 मध्ये 6.7 टक्के होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.