सोलापूर : सोलापूर ते पुणे रेल्वे मार्गावरील भाळवणी ते भिगवण या 55 किलोमीटरच्या दुहेरीकणाचे काम हाती घेण्यात आल्याने ता. 19 जुलैपासून या कामास सुरवात करण्यात आली. याकरिता तब्बल 44 दिवस सोलापूर पुणे हुतात्मा एक्सप्रेस दुहेरीकरणाच्या कामामुळे रदद करण्यात आली. त्यामुळे 1 ते 16 सप्टेंबर पर्यंत रदद करण्यात आली आहे. मात्र हे काम न झाल्याने पुन्हा दुसऱ्यांदा रेल्वे प्रशासनास सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस रदद करण्याची वेळ आली आहे.
सोलापूर विभागांत दुहेरीकणाचे काम 2010 पासून सुरु आहे. हे काम रेल्वे प्रशासनाने आरव्हीएनएल अर्थांत रेल विकास निगम लिमिटेड यांना दिले आहे. त्यामुळे विभागांतील भाळवणी ते भिगवण या 55 किमीच्या कामासाठी सोलापूरकरांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस दुसऱ्यांदा रद्द करण्यात आली आहे. भाळवणी ते भिगवण दरम्यान दुहेरीकरणाबरोबर विद्युतीकरणाचे काम देखील ब्लॉक दरम्यान केले जात असल्याची माहिती आरव्हीएनच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हुतात्मा एक्सप्रेस बंद असल्याने पुण्याकडे जाणाऱ्या सोलापूरच्या प्रवाशांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. खाजगी वाहनांचे भाडे जास्तीचे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याच्या प्रतिक्रिया सामान्य प्रवाशांनी सकाळशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आणखीन काही दिवस तरी हुतात्मा एक्सप्रेसने प्रवास करण्यासाठी सोलापूरकरांना प्रतिक्षाच करावी लागणार आहे. भाळवणी आणि भिगवण दरम्यान सुरु असलेल्या कामाची देखभाल आणि दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दीड हजार प्रवाशांची गैरसोय होणार
हुतात्मा एक्सप्रेसने पुण्याकडे जाण्यासाठी सोलापूरकरांचा प्रचंड प्रतिसाद या गाडीस असतो. दररोज सरासरी 1200 ते 1500 प्रवासी या गाडीने प्रवास करतात. सलग 60 दिवस गाडी रद्द झाल्याने सोलापूरकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रेल्वे रद्द होत असल्याने सोलापूरकरांची प्रचंड गैरसोय होत आहे.
मात्र एक संपूर्ण रेल्वे रदद होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे कोईमतूर-कुर्ला एलएलटी एक्सप्रेस ही गाडी सकाळी 6 वाजता असल्याने या गाडीवर प्रवाशांचा भार येणार आहे. मात्र ही गाडी येतानाच भरुन येते आणि तिकीट देखील वेटिंग मिळत असल्याने सोलापूरकरांची गैरसोय होत आहे.
कसे होणार काम
भाळवणी ते भिगवण या 55 किमीच्या सेक्शनमध्ये दररोज सायंकाळी 5 ते 7 दरम्यान ब्लॉक घेऊन दुहेरीकरणाचे काम केले जाणार आहे. यासाठी बलास्ट मशीनव्दारे नवीन खडी टाकली जाणार आहे. रुळाखाली खडीचा एक फुटाचा थर टाकला जाणार आहे. त्याचबरोबर स्लीपर टाकल्यानंतर रुळ टाकले जाणार आहे.
त्याचबरोबर विद्युतीकरणाचे खांब लावले जाणार आहेत. त्यानंतर वायर ओढली जाणार आहे. ही सर्व कामे दोन टप्प्यात चालणार आहेत. सिग्नल आणि पॉईंट एकमेकांस जोडले जाणार आहेत. सर्व पॉईंट हे स्टेशन मास्तर यांच्याकडून ऑपरेट होतात की नाही याची पाहणी केली जाणार आहे.
या गाडया आहेत सुरु
कुर्ला-कोईमतूर एलएलटी एक्सप्रेस, मुंबई-हैदराबाद हुसेनसागर एक्सप्रेस, चेन्नई-मुंबई एक्सप्रेस, कर्नाटक एक्सप्रेस, सोलापूर-सिध्देश्वर एक्सप्रेस, मुंबई- बेंगलोर उद्यान एक्सप्रेस, मुंबई-भुनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, नागरकोईल एक्सप्रेस, सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस, मुंबई-गदग एक्सप्रेस.
सकाळी सहा वाजता सोलापूर स्थानकांवरुन कोईमतूर-कुर्ला एलएलटी एक्सप्रेस पुण्याच्या दिशेने धावते. मात्र हुतात्मा एसक्प्रेस केवळ अर्ध्या तासानंतर पुण्याकडे जाते. मात्र ही गाडी रदद करण्यात येते. त्यामुळे सोलापूरकरांची अत्यंत सोयीची आणि स्वस्तात प्रवास करण्याची गाडी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्सप्रेस लवकरात लवकर सुरु करावी.- राजू कांबळे, सचिव, रेल्वे प्रवासी संघटना, सोलापूर
दुहेरीकरणाचे कामासाठी इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हुतात्मा एक्सप्रेस रदद करण्यात आली आहे. जसे दुहेरीकरणाचे आणि विद्युतीकरणाचे काम सुरु होताच गाडी सुरु करण्यात येईल. - प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.