Accident : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघात; एकाचा मृत्यू, चार जण जखमी

लक्झरी बसने माल ट्रकला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले.
accident news
Accident Newsesakal
Updated on

मोहोळ - लक्झरी बसने माल ट्रकला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी पहाटे अडीच वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळी फाट्याजवळ झाला. जाबीर अन्सारी वय 32 रा हैदराबाद असे मृताचे नाव आहे.

तर नेहा विजयकुमार वय 27, सुहासिनी नकुलचंद भिसवाल वय 27 दोघे रा हैदराबाद, पूजा भास्कर अंजनकर वय 25 रा देवगाव जिल्हा बुलढाणा, फीज फातिमा अब्दुल काशीम शेख वय 32 रा मुंबई अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, लक्झरी क्रमांक एम पी 9 डी एल 8091 ही पुण्याहून सोलापूरच्या दिशेने जात होती, त्याचवेळी तिच्या समोरून मालट्रक क्रमांक एम एच 12 एस एफ 5272 ही सोलापूरच्या दिशेने चालली होती. दोन्ही वाहने खंडाळी फाट्याजवळ येतात लक्झरीने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

त्यात जाबीर अन्सारी हा गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या अपघाताची फिर्याद हाशमी सय्यद असेमअली वय 26 रा हैदराबाद याने मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास हवालदार अतुल क्षीरसागर करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.