सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज (शनिवारी) जाहीर करण्यात आला. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली असून २९ सप्टेंबरला मतदान होणार आहे.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या प्राचार्य मतदारसंघातून दहा सदस्य, संस्था प्रतिनिधीसाठी सहा, शिक्षकांसाठी दहा, पदवीधर मतदारमधून दहा तर विद्यापीठ शिक्षकमधून तीन सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाकडून यापूर्वीच आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. विद्यापरिषदेसाठी प्रत्येक विद्याशाखेतून दोन शिक्षक निवडले जातील. एकूण चार विद्याशाखा असून त्यातून सदस्य निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत.
त्याचबरोबर अभ्यास मंडळासाठी देखील निवडणूक होणार आहे. प्रत्येक अभ्यास मंडळावर तीन महाविद्यालयीन अथवा मान्यताप्राप्त संस्थेचे विभागप्रमुख निवडले जाणार आहेत. या तिन्ही अधिकार मंडळाच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवाराने निवडणूक नोटीसमध्ये नमूद केलेल्या आरक्षण, शैक्षणिक अर्हता व अनुभवासंदर्भातील प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. ९, १० आणि ११ सप्टेंबर रोजी सुट्ट्या असल्या तरीदेखील उमेदवारांसाठी विद्यापीठातील सभा व निवडणूक विभाग, वित्त व लेखा विभाग आणि आवक विभाग सुरू राहील, असे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभारी कुलसचिव श्रेणिक शाह यांनी दिली.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
१२ सप्टेंबर : उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार १३ सप्टेंबर : उमेदवारी अर्जांची छाननी (सकाळी ११ वाजेपर्यंत) १६ सप्टेंबर : सायंकाळी पाचपर्यंत उमेदवारी अर्ज माघार १७ सप्टेंबर : उमेदवारी अर्जावर आवश्यक असल्यास कुलगुरूंकडे अपिल करता येणार १८ सप्टेंबर : पात्र उमेदवारांच्या नावांचे नोटिफिकेशन निवडणूक पोर्टलवर प्रसिद्ध केले जाणार २९ सप्टेंबर : सकाळी ९ ते सायंकाळी चारपर्यंत शहर व जिल्ह्यातील १६ मतदान केंद्रांवर मतदान ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर : मतमोजणी
मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची बैठक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यासंदर्भात विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची बैठक उद्या (रविवारी) सायंकाळी चार वाजता महापालिकेसमोरील मोकळ्या जागेत बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतील सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सिद्राम सलवदे, सरचिटणीस प्रा. डॉ. दिगंबर झोंबाडे यांनी केले आहे.
132 words / 949 characters
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.