Solapur : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पर्यावरण भुषण पुरस्कार प्रविण तळेंना जाहीर

नदी पूनर्जिवन प्रकल्पात ते चला जाणूया नदीला अभियानाचे सहसमन्वयक म्हणून ते जलबिरादरीचे प्रमुख डॉ. राजेंद्रसिंहा यांच्या समवेत काम करत आहेत.
Solapur
Solapur Sakal
Updated on

सोलापूर - येथील पर्यावरण संरक्षण गतिविधीचे समन्वयक प्रविण तळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा पर्यावरण भुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

प्रविण तळे हे पर्यावरण गतिविधी संरक्षण समितीच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून कार्य करत आहेत. जिल्हाभरातील विविध पर्यावरण विषयक उपक्रमात ते सहभागी असतात. जिल्हाभरात वृक्षारोपण व वृक्षांचे आच्छादन मोहिमेत त्यांचा सहभाग असतो.

Solapur
Mumbai Honey Trap:मुंबईतील खळबळजनक घटना! कोंबडीचं रक्त लावून बलात्काराचा केला आरोप; हनी ट्रॅपमधून ३ कोटी उकळले

मध्य रेल्वेच्या सहकार्याने सोलापूर, कुर्डूवाडी व पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात मध्य रेल्वे व सामाजिक वनीकरण यांच्या करार घडवून आणत ४० हजार झाडे लावण्याचे कार्य त्यांनी केले. झाडांची भीशी या उपक्रमात ते सदस्य म्हणून सहभागी आहेत. तसेच रेल्वेच्या जागेत सघनवनाची निर्मिती त्यांनी केली.

Solapur
Mumbai Honey Trap:मुंबईतील खळबळजनक घटना! कोंबडीचं रक्त लावून बलात्काराचा केला आरोप; हनी ट्रॅपमधून ३ कोटी उकळले

नदी पूनर्जिवन प्रकल्पात ते चला जाणूया नदीला अभियानाचे सहसमन्वयक म्हणून ते जलबिरादरीचे प्रमुख डॉ. राजेंद्रसिंहा यांच्या समवेत काम करत आहेत. माणगंगा नदी ,कासाळगंगा नदी, भीमा नदी ,कोरडा नदी,आदिला नदी, धुबधुबी नदीच्या पुनर्जीवन मोहिमेत त्यांनी सहभाग नोंदवला आहे.

या शिवाय पाच साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. संपूर्ण अक्कलकोट तालुका वृक्षाच्छादीत करण्याच्या भव्य योजनेच्या नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.