Solapur Railway: बांद्रा-वेलंकन्नी-बांद्रा विशेष एक्स्प्रेस धावणार

Solapur Latest Update: तिसऱ्या दिवशी ३१ ऑगस्ट आणि १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बांद्रा रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
बांद्रा-वेलंकन्नी-बांद्रा विशेष एक्स्प्रेस धावणार
Solapur Railway: sakal
Updated on

Latest Solapur News: श्रावणातील सणानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी व वाढती मागणी लक्षात घेऊन सोलापूर विभागातून धावणारी बांद्रा - वेलंकन्नी - बांद्रा ही विशेष एक्स्प्रेस २७ ऑगस्टपासून धावणार आहे.

बांद्रा-वेलंकन्नी-बांद्रा विशेष एक्स्प्रेस धावणार
Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?

या गाड्यांचा रेल्वेगाडी क्र. ०९०९३ बांद्रा - वेलंकन्नी विशेष एक्सप्रेस २७ ऑगस्ट, ६ सप्टेंबर रोजी ही गाडी बांद्रा रेल्वे स्थानकाहून रात्री ९.२० वाजता निघणार आणि तिसऱ्या दिवशी २९ ऑगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता वेलंकन्नी रेल्वे स्थानकावर पोचेल. रेल्वेगाडी क्र. ०९०९४ वेलंकन्नी - बांद्रा विशेष एक्सप्रेस २९ ऑगस्ट आणि ८ सप्टेंबर रोजी वेलंकन्नी रेल्वे स्थानकाहून रात्री १० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ३१ ऑगस्ट आणि १० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता बांद्रा रेल्वे स्थानकावर पोचेल.

बोरीवली, वसईरोड, कमानरोड, पनवेल, लोणावळा, पुणे, दौंड, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, कृष्णा, रायचूर, गुंतकल, कुडप्पा, रेनिगुंटा, कटपाडी, वेल्लोर, तिरुवण्णामलाई, विल्लुपुरम, कुड्डालोर पोर्ट, चिदंबरम, सरकाझी, मइलाडुतुरै, तिरुवरुर, नागापट्टिनाम आदी ठिकाणी थांबा असणार आहे.

बांद्रा-वेलंकन्नी-बांद्रा विशेष एक्स्प्रेस धावणार
Solapur : कृत्रिम पद्धतीने सापांची अंडी उबविण्यात वनविभागाला यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.