सोलापूर : ‘अग्निपथ’मुळे रेल्वेची सुरक्षा ‘ॲलर्ट’

स्थानकासह ट्रॅकवरही शस्त्रधारी जवान तैनात; प्रवाशांवर असणार सीसीटीव्हीची ‘नजर’
solapur
solapursakal
Updated on

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेला देशभरात विरोध होत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू असून, बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळ झाल्याच्या घटना समोर येत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलकांनी गाड्या पेटवल्या आहेत. तर, भाजप नेत्यांच्या घरांवर हल्लेही होत आहेत. याचे पडसाद इतरत्रही दिसू लागले आहेत. त्याअनुषंगाने खबरदारी घेत सोलापूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलिस आणि शहर पोलिस असा मोठा तिहेरी बंदोबस्त लावण्यात आला आहे.

१७ ते २२ वर्षीय तरुणांना चार वर्षांसाठी लष्करात घेणार मग चार वर्षांनी त्या मुलांनी करायचे काय? ऐन उच्च शिक्षण घेण्याच्या कालावधीत मुलांना भरती करून घेणार व चार वर्षांनंतर त्यांचे भविष्य वाऱ्यावर सोडणार का, असा सवाल करत तरुणांच्या भविष्याशी खेळ करणारी व लष्कराचे कंत्राटीकरण करणारी केंद्र सरकारची ही योजना विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणणारी आहे. ही योजना रद्द करा, अशी मागणी करत १८ जून रोजी आंदोलन करणाऱ्यांना रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. याच पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर आणि परिसरात कोणतीही अनुचित घटना घडणार नाही आणि येणाऱ्या समूहांवर आरपीएफ, जीआरपी तसेच शहर पोलिसांचा विशेष वॉच असणार आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गाड्यांमध्ये देखील गस्त घालण्यासाठी जवान तैनात करण्यात आले आहेत.

ठळक बाबी…

- आरपीएफ व जीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त

- प्रत्येक प्रवाशावर सीसीटीव्हीची नजर

- युवकांच्या समूहांवर गुप्तचर विभागांकडून लक्ष

- रेल्वेची प्रवासी सेवा सुरळीत

- सुरक्षा रक्षकांची ड्यूटीची वेळ वाढविण्यात आली

- सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य, डॉगस्कॉड, शस्त्रे सज्ज

सोलापूर रेल्वे स्थानकावर कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे विशेष लक्ष ठेवले जात आहे. इतकेच नाही तर प्रवाशांवर विशेष वॉच ठेवला जात आहे. त्याचबरोबर प्रवासी गाड्यांबरोबर मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांवर देखील लक्ष दिले जात आहे. एकंदरीत, रेल्वे स्थानकावर शस्त्रधारी जवान तैनात असल्याचे पाहायला मिळत आहे.

‘अग्निपथ’वरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणा ॲलर्ट आहे. ‘अग्निपथ’वरून रेल्वे संपत्तीचे नुकसान केले जात आहे. तसे होऊ नये म्हणून अशा घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलिसांचे जवान रेल्वे स्थानकावर तैनात आहेत.

- श्रेयांश चिंचवाडे, विभागीय सुरक्षा आयुक्त, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.