सोलापूर: हजरत इब्राहिम व त्यांचे चिरंजीव हजरत इस्माईल यांनी दाखविलेल्या अतुलनीय त्यागाचे स्मरण असलेली ईद-उल-अजहा (बकरी ईद) सोलापूर शहर आणि परिसरात उत्साहात साजरी झाली. या निमित्ताने सामुहिक नमाजपठण झाले. मुस्लीम समाजबांधवांनी नमाज अदा करत सर्वांसाठी सुयश चिंतले.
‘भरपूर पाऊस पडू दे, देशात सुख, शांती लाभू दे, सर्वांच्या हाताला काम दे, सर्वांच्या आयुष्यात भरपूर सुख समृद्धी आण’ अशी प्रार्थना यावेळी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली. तसे अल्लाकडे साकडे घालण्यात आले.
होटगी रोड येथील ईदगाह मैदान, असार मैदान व अलमगीर इदगाह, रंगभवन येथील इदगाह मैदान,जुनी मिल स्टेशन रोड येथील ईदगाह मैदान येथे बकरी ईदनिमित्त गुरुवारी मुस्लिम बांधवांनी सामूदायिक नमाज अदा केली. सकाळी होटगी रोड येथील ईदगाह मैदान येथे नऊ वाजता सामूदायिक नमाज पठण करण्यासाठी मुस्लिम समाज बांधव जमले होते.
ईदच्या नमाजानंतर समाजबांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
थेट ईदगाह मैदानावरून...
होटगी रस्त्यावरील ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्यानंतर पोलिस बांधवांच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन स्वागत
पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी होटगी रस्त्यावरच्या ईदगाह मैदानावर शहर काझी व मुस्लिम बांधवांनादिल्या शुभेच्छा.
ईदची नमाज शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा सर्वच ईदगाह मैदानावर दर्गा, मशिदी समोर मोठा बंदोबस्त होता तैनात.
मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या दिल्या शुभेच्छा.
शहर काझी अमजद अली, शहर काजी अब्दुर राफे यांनी शुभेच्छा देण्यासह केले उपदेश.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.