Solapur Rain: मंगळवेढ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर,नागरिकांची गैरसोय!

Maharashtra Rain : रस्त्याच्या कामाबाबत नगरपालिकेवर महिलांचा मोर्चा देखील नेला. तात्काळ रस्त्याचे काम करावे. अन्यथा पुन्हा मोर्चा नेण्यात येईल
Solapur Rain: मंगळवेढ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर,नागरिकांची गैरसोय!
Solapur sakal
Updated on

Solapur Heavy Rain: शहरातील दुर्गामाता परिसरात पडलेल्या पावसामुळे चक्क रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. रस्त्याचे काम करण्याबाबत नगरपालिका कधी लक्ष देणार ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे

सध्या दुर्गामाता नगर परिसरामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेचे कार्यालय, एचडीएफसी बँक, व अन्य खाजगी सात ते आठ पतसंस्था, मल्टीस्टेट बँका, वैद्यकीय दवाखाने,मेडीकल,झेराक्स दुकान,प्राथमिक शाळा, शिक्षक पतसंस्थेचे कार्यालय, व अन्य छोटी मोठी दुकाने असल्यामुळे या परिसरामध्ये नागरिकांची सतत काही ना काही ना काही कारणास्तव ये जा असते मात्र याच मार्गावरून ये जा करण्यासाठी असलेल्या रस्त्याचे काम नगरपालिकेने अद्याप सुरू न केल्यामुळे पावसात पडलेले पाणी चक्क रस्त्यावर साचले आहे.

Solapur Rain: मंगळवेढ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर,नागरिकांची गैरसोय!
Solapur: सोलापूर विकास मंचाकडून पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत

त्यामुळे रस्ताच पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना या मार्गावरून ये- जा करणे अडचणीचे ठरले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार या पुढील काळात देखील घडण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपालिकेने तातडीने रस्त्याचे काम सुरू करून या भागातील बँकिंग व शासकीय कामासाठी व वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी नागरिकांत पुढे येत आहे.(heay rain in solapur)

Solapur Rain: मंगळवेढ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर,नागरिकांची गैरसोय!
Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्यातही ८४ टँकर सुरूच; ६५ गावे व ५५२ वाड्या तहानलेल्याच

नागरिकांची सतत येजा असलेल्या परिसरामध्ये नगरपालिकेने कायम दुर्लक्ष केले. सध्या पावसाळ्याच्या दिवसात कायम वर्दळच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या रस्त्यावर पाणी आल्यामुळे व्यवसायिकांना ग्राहक मिळत नाही. यापुर्वी गटार आणि रस्त्याच्या कामाबाबत नगरपालिकेवर महिलांचा मोर्चा देखील नेला. तात्काळ रस्त्याचे काम करावे. अन्यथा पुन्हा मोर्चा नेण्यात येईल

भागीरथी नागणे, माजी नगरसेविका

Solapur Rain: मंगळवेढ्यात पावसाचे पाणी रस्त्यावर,नागरिकांची गैरसोय!
Solapur : जप्त वाहन सोडण्यासाठी 'इतक्या' हजारांची घेतली लाच; दोघांना झाली अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.