Solapur - भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून 14 गावांना दिलासापाऊस लांबल्याने निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्ष बंद असलेल्या भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून 14 गावांना पाणीपुरवठा करत तहानलेल्या जनतेला दिलासा दिला.
स्व.आ.भारत भालके यांच्या प्रयत्नातून मंगळवेढ्यातील दुष्काळी गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून लोकवर्गणीची अट रद्द करून भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी रूपाने येणे बाकी 40 लाख आणि विज बिल 1 कोटी 17 लाख या तफावतीमुळे वीज बिल न भरल्यामुळे ही योजना गेली दोन वर्षे बंद होती योजना सुरू करण्यासाठी आ.समाधान आवताडे यांनी अनेक बैठका घेतल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोलापूर येथे याबाबतचे बैठक घेऊन वसुली करण्याच्या सूचना दिल्या होत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न देखील उपस्थित केला मात्र योजना सुरू होण्याच्या संदर्भात ठोस काही निर्णय होईना अखेरीस ग्रामपंचायतला मिळणाऱ्या मुद्रांक अनुदानातून जवळपास 40 लाखाचे अनुदान या योजनेचे थकीत वीज बिल भरण्यासाठी वर्ग करण्यात आले.
वीज बिल भरून योजना सुरू करताना मुख्य पाईपलाईन मध्ये वारंवार बिघड झाल्यामुळे ही पाणी पुरवत होण्यास विलंब होत होता परंतु आ. समाधान अवताडे यांनी गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांना मी आणि खासदार तुमच्या पाठीशी आहे मात्र या योजनेचे पाणी मिळालेच पाहिजे अशी खंबीर भूमिका घेतल्याने यामध्ये असलेल्या बिगड पूर्ववत करून या योजनेचे पाणी सध्या जुनोनी, खूपसंगी,गोणेवाडी ,शिरशी,पाटखळ,खडकी ,मेटकरवाडी ,हाजापुर ,हिवरगाव ,नंदेश्वर ,सिद्धकेरी ,जालीहाळ ,
भाळवणी ,भोसे गावांना उपलब्ध झाले. तालुक्यामध्ये नेहमी जूनमध्ये पडणारा पाऊस यंदा लांबल्याने तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले अशात मुख्य पाणी योजना बंद आहेत त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होऊ लागली टँकरचा प्रस्ताव देणे आणि त्याकर मंजूर होणे यामध्ये अनेक प्रशासकीय कसरती कराव्या लागत आहेत त्यापेक्षा ही योजना सुरू होणे गरजेचे होते.
ती योजना पूर्ववत झाल्यामुळे नागरिकांना पावसाळ्यातील पाणीटंचाईच्या तोंडावर दिलासा मिळाला.यासाठी आ.समाधान आवताडे,नियोजन सदस्य प्रदीप खांडेकर, ग्रामीण पाणीपुरवठाचे प्र.कार्यकारी अभियंता सुनिल कटकदौंड,उपअभियंता राजकुमार पांडव, गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील शिखर समितीचे अध्यक्षा मनिषा खताळ,सचिव जमीर मुलाणी यांनी परिश्रम घेतले.
सौर प्रकल्प व मोबाईल केबलसाठीच्या खोदाईमुळे जलवाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तिघांकडून नुकसानीची वसुली केली. त्यामुळे सध्या पाणी पूर्ववत झाले.इतर गावातील पाईपलाईन मध्ये बिघाड नसल्यास त्या गावांना देखील लवकर पाणी मिळणार आहे मात्र बिघाड झालेल्या गावाला देखील दुरुस्ती करून लवकर पाणी देण्याचा प्रयत्न आहे.
राजकुमार पांडव, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.