सोलापूर : शालेय विद्यार्थी देशाचे उद्याचे भविष्य आहेत. त्यांना विद्यार्थी दशेतच रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळणे आवश्यक आहे. कोणाचाही अपघात होऊ नये, या हेतूने आरटीओ कार्यालयात ‘सुरक्षा कवच कक्ष’ तयार करण्यात आला आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सुरक्षा कवच कक्षाचे बुधवारी (ता. २१) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर, वाहतूक निरीक्षक अमरसिंग गवारे, महेश रायभान, राहुल खंदारे, संदीप शिंदे, शिरीष तांदळे, अमृता देशमुख, प्रियंका माने, तेजस्विनी वायचळ, विद्यादेवी जाधव, ऐश्वर्या धल्लू आदी उपस्थित होते. सुरवातीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी ‘सुरक्षा कक्ष‘ची माहिती दिली. शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच रस्ता सुरक्षेचे महत्त्व कळावे, या हेतूने हा सुरक्षा कवच स्थापन करण्यात आला आहे. त्यामध्ये रस्ता सुरक्षेचे महत्त्व विषद करणारे विविध कक्ष असतील. साप शिडी खेळ, रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत स्पर्धा, मुलांना शालेय साहित्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटावे म्हणून पेन- पेन्सिल, फ्रेंडशिप बँड, स्टिकर्स, डायरी, ग्रीटिंग्स अशा वस्तूंचे वाटप या कक्षातून केले जाणार आहे.
ठळक बाबी...
रस्ता सुरक्षा कवच कक्षातून अपघात अन् वाहन चालवण्यासंबंधीचे दिले संपूर्ण संदेश
सापसिडीतून दिली लर्निंग व परमनंट लायसन आणि वाहतूक नियम मोडला तर मृत्यू कसा होतो, याची माहिती
छोटा ट्रॅक तयार करून त्यावर ठेवल्या गाड्या; रस्तासुरक्षा व वाहतूक नियम कसे पाळायचे हे त्यातून दाखवले
आम्ही वाहतूक नियम पाळू, सिटबेल्ट, हेल्मेट वापरण्याची प्रतीज्ञा देण्यासाठी स्वतंत्र कक्ष
पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देणारा तो महत्त्वाचा कक्ष सर्वांसाठी खुला
सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कक्ष
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे दिल्यास पुढे मोठी होऊन वाहनचालक झाल्यानंतर त्यांना या सुरक्षा कवच कक्षाचा निश्चितच फायदा होईल. वाहतूक जनजागृतीसाठीचा हा नाविन्यपूर्ण कक्ष आहे. सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना याठिकाणी येऊन तो कक्ष पाहता येईल.
- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.