Solapur : सांगोल्यातील क्रीडा संकुल तसं चांगल पण; संविधांअभावी नागरिक, खेळाडूंमध्ये नाराजी

वयोवृद्ध नागरिकांना आपल्या शरीराचा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.
solapur
solapursakal
Updated on

सांगोला - सांगोला शहरातील मध्यभागी असलेल्या क्रीडा संकुलनामध्ये विद्यार्थी, पोलीस, मिलिटरीमध्ये भरतीसाठी प्रयत्न करणारे तसेच व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या नेहमीच मोठ्या प्रमाणावर असते. या क्रीडा संकुलनाचा वापर चांगला होत असला तरी स्वच्छतेबाबतीत व सुविधांअभावी नागरिकांमधून नाराजी व्यक्त हेत आहे.

सध्याच्या धावत्या युगामध्ये सर्वच वयोगटातील तरुण, वयोवृद्ध नागरिकांना आपल्या शरीराचा काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. खाण्याबरोबरच नियमित व्यायाम करण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. व्यायामासाठी विशेषतः वयोवृद्धांना सकाळ - संध्याकाळ चालण्यासाठी सांगोल्यातील क्रीडा संकुलनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

रस्त्यांवर अपघात वाढल्याने अनेक नागरिक चालण्यासाठी सध्या शहराच्या मध्यभागी असलेल्या या क्रीडा संकुलनाचाच वापर करीत असतात. पोलीस मिलिटरी व एमपीएससीद्वारे परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी या मैदानात व्यायामासाठी, खेळण्यासाठी येत असतात. या क्रीडा संकुलनामध्ये चालण्याच्या ट्रॅकबरोबरच बास्केटबॉलचे मैदान असले तरी या बास्केटबॉलसाठी स्टॅन्ड उपलब्ध नसल्यामुळे त्या मैदानाचा असूनही काही उपयोग होत नाही. मैदानावर अनेक ठिकाणी गवत व इतर छोटी मोठी झुडपे वाढलेले दिसून येतात. या क्रीडा संकुलनाच्या मध्ये हायमास्ट दिवा असला तरी अनेक वेळा तो बंदच असल्याने पहाटेच्या वेळी व्यायाम करणे व चालणे या मैदानावर कठीण होत असते.

solapur
Solapur Mangalwedha : ग्रामपंचायत निवडणुक चौथ्या दिवशी सदस्यासाठी 347 तर सरपंचासाठी 50 अर्ज

बास्केटबॉल क्रीडा प्रेमींमध्ये नाराजी -

बास्केटबॉलची मैदाने शक्यतो दक्षिण - उत्तर दिशेस असतात. परंतु सांगोल्यातील क्रीडा संकुलनातील बास्केटबॉल मैदान हे पूर्व - पश्चिम असल्याचे दिसून येते. सध्या इथे फक्त सिमेंटचे मैदान शिल्लक असून इतर काहीही साहित्य उपलब्ध नसल्याने बास्केटबॉल प्रेमी नाराजी व्यक्त करतात. अशा खेळ प्रकारात मैदानासाठी आलेला निधीचे होते तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मैदानेच चुकीची तयार होत असतील तर खेळ कसा सुधरेल असा प्रश्न क्रीडाप्रेमी उपस्थित करीत आहेत.

solapur
Solapur : प्रशासनाच्या चुकीच्या पावसाची आकड़ेवारी कळविण्यामुळे दुष्काळी यादीतुन मोहोळ तालुका वगळला - आमदार माने

याकडे लक्ष द्यावे

मैदानावरील गवत व झाडे, झुडपे काढण्यात यावीत

- बास्केटबॉल मैदानामध्ये बास्केटस्टॅन्डची उभारणी करावी

- मैदाना शेजारीच मुलींना व महिलांसाठी स्वच्छतागृह असावे

- लांब उडीसाठी मऊ मातीची किंवा वाळूची व्यवस्था करावी

- सायंकाळी हायमास्ट दिवे नियमित लावावीत

- मैदानावर येणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा

- खुल्या मैदानावर व्यामासाठीचे साहित्य उपलब्ध करुन द्यावीत.

solapur
Solapur : सांगोला नाका परिसर सुधारणा कामास प्रारंभ; मंगळवेढा शहरालगतच्या कान्होपात्रानगर ग्रामपंचायतीची अधिसूचना

क्रीडा संकुलनासाठी आलेल्या निधीचा योग्य वापर केला गेला पाहिजे. क्रीडा मैदानेच सुसज्य नसतील तर सदृढ भारत बनेल तरी कसा ? यावर होणाऱ्या निधीचा भ्रष्टाचारमुक्त वापर करून यासाठी सक्षम क्रीडा अधिकारी नेमला पाहिजे - आनंदा माने, माजी नगरसेवक, सांगोला.

क्रीडा संकुलनाच्या बाबतीत ज्या काही असुविधा नागरिकांना सतावत आहेत अशा दुरुस्त करण्यासाठी निश्चितपणे सुधारणा करेन. स्वच्छतागृह व इतर संकुलनामधील सुधारणाकामी नव्याने प्रस्ताव पाठवण्यात येतील - सुप्रिया गाढवे, तालुका क्रीडा अधिकारी, सांगोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.