Solapur : आ.अवताडेंच्या गाव भेट दोंऱ्यात प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी; कारवाईच्या सुचना

दारू विक्रेत्यांची वारंवार पोलिसांकडे तक्रार करून ही पोलीस दखल घेत नाहीत.
Samadhan Aavtade
Samadhan Aavtade Sakal
Updated on

Solapur - आ.समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यामध्ये दोन दिवसात नागरिकांनी विविध खात्याच्या कारभारावर जनतेचा रोष पाहता आज दौय्रात तालुका कृषी अधिकारी,सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल,साहाय्यक निबंधक,गटविकास अधिकारी यांनी दौऱ्यात दांडी मारत अन्य कर्मचाऱ्यांना पाठवल्याचे लक्षात येताच गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना आ आवताडे यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने खळबळ उडाली.

आज दि.9 रोजी फटेवाडी, तळसंगी, मरवडे, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट, डिकसळ, माळेवाडी, पौट, येळगी, हुलजंती या गावचा गाव भेट दौरा केला.

त्यांच्यासमवेत तहसीलदार मदन जाधव, ग्रामीण पाणीपुरवठाचे राजकुमार पांडव बाल विकास अधिकारी जगन्नाथ गारूळे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर ,शशिकांत चव्हाण, राजेंद्र सुरवसे, विजय माने ,शिवाजी पवार, दत्तात्रय गणपाटील, अल्लीभाई इनामदार,सुधाकर मासाळ, सचिन चव्हाण, रावसाहेब फटे, उपस्थित होते.

या दौऱ्यात अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी दांडी मारत अन्य कर्मचाऱ्यांना पाठवल्यामुळे प्रश्नसंदर्भात जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे विचारायचे कोणाला असा प्रश्न नागरिक व आ.आवताडे यांच्यासमोर उभा राहिला.त्यामुळे आ.आवताडे यांनी आक्रमक पवित्रा घेत दांडी बहाद्दर अधिकाय्रा विरोधात वरीष्ठ अधिकाय्रास कळविले.

Samadhan Aavtade
Solapur : पंढरपूरचा निर्मलकुमार भोसले एमपीएससी परीक्षेत राज्यात दुसरा.

आजच्या दौय्रातही ग्रामस्थांनी जलजीवनमधील पाणीपुरवठा, महावितरण,पुरवठा,पंचायत समिती,जि.प.बांधकाम या खात्याविरोधात अनेक तक्रारी केल्या.

बाल विकास अधिकारी जगन्नाथ गारूळे ज्या कुटुंबांमधील 18 वर्षाखालील मुलाची आई किंवा वडील मयत झाले किंवा ते त्या मुलाला सांभाळत नाहीत अशा मुलांचे पालन करणाऱ्या पालनकर्त्याला बालसंगोपनासाठी अनुदान देत आहे.

त्यासाठीची कागदपत्रे दिली तरी त्यांना अनुदान सुरू करून देण्यात येईल. मरवडे येथे मनरेगातून मागणी केलेल्या नवीन विहिरीच्या कामाला गटविकास अधिकारी मंजुरी देत नसल्याची व ग्रामपंचायत दप्तर चोरीला गेल्याची तक्रार केली, कागष्ट येथे जलजीवनच्या योजनेमध्ये वाडी वस्तीचा समावेश करावा व रस्त्याची मागणी करण्यात आली डिकसळ येथे पाण्याच्या हौदात विषारी औषध टाकलेल्या आरोपीला अटक पोलीस तपास करीत नसल्याची तक्रार केली.

Samadhan Aavtade
Solapur Crime : यात्रेत महिलेच्या गळ्यातील सव्वा लाख रुपयाच्या मंगळसूत्रावर चोरट्याने मारला डल्ला

पौट गावात महिलांनी गावात बेसुमार दारू विक्री सुरू असून प्रपंच उध्वस्त झाले आहेत या दारू विक्रेत्यांची वारंवार पोलिसांकडे तक्रार करून ही पोलीस दखल घेत नाहीत तुम्ही तर दखल घेऊन संसार वाचवा अशी मागणी महिला भगिनींनी केल्यानंतर दारू का बंद होत नाही याचा जाब पोलिसांना विचारत दोन दिवसात या गावातील दारू बंद झाली नाही,

तर मला माझ्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशारा आ आवताडे यांनी पोलिसांना दिला. दौऱ्यात नागरिकांच्या तक्रारी आणि त्याचे निरसन करण्यास बराच वेळ जात असल्यामुळे हुलजंती येथे रात्री उशिरापर्यंत हा गाव भेटीचा दौरा दौरा सुरूच होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.