Latest Solapur News: म्हैसाळ योजनेचा कालवा फुटल्याने तालुक्यातील शिरनांदगी येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. दोन वर्षे दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना यंदा समाधानकारक उत्पन्नाची अपेक्षा असतानाच कालवा फुटीने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.
तालुक्याच्या दक्षिण भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी दिले जाते दरवर्षी या योजनेचे पाणी मागणी करून देखील वेळेवर दिले जात नव्हते परंतु यंदा राज्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील धरणे ओव्हरप्लो झाल्यामुळे ते पाणी वितरिकेमार्फत सोडले जाते यंदा तालुक्यात देखील मान्सून पावसाने वेळेवर हजेरी लावल्यामुळे बाजरी,तूर, मका, कांदा, सूर्यफूल या पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असतानाच तालुक्याच्या दक्षिण भागात पुन्हा कालव्यातून पाणी सोडले जात आहे.