Solapur : डोळ्यांदेखत संसार उद्ध्वस्त; चिमणी जमीनदोस्त होताच अपंग कामगाराच्या पत्नीनं फोडला टाहो

शेवटच्या क्षणापर्यंत चिमणी राहील आणि रोजगार असेल, असा विश्वास त्यांना वाटत होता.
Siddheshwar Sugar Factory Solapur Chimney
Siddheshwar Sugar Factory Solapur Chimneyesakal
Updated on
Summary

ज्यावेळी चिमणी कोसळली तेव्हा सुलोचना यांनी एकच टाहो फोडला. चिमणी नाही ओ, माझा संसार पडलाय, माझा आधार गेलाय.

सोलापूर : दुपारी साडेतीनची वेळ… कानावर पडणारा ब्रेकरचा मोठा आवाज... पोलिसांची दहशत... घराच्या उंबऱ्यातून एकटक त्या चिमणीकडे डोळे लावून बसल्या होत्या… कारखाना (Siddheshwar Sugar Factory Solapur Chimney) बंद पडल्याने आमची रोजीरोटी बंद झाली…

आता उद्या मी कुठे जाऊ, असे स्वत:शीच पुटपुटत त्या महिलेने डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली. नुसती चिमणी पडली नाही तर ''माझा संसार पडलाय ओ, माझा आधार गेलाय'' म्हणत कारखान्यातील अपंग कामगाऱ्याच्या पत्नीने टाहो फोडत भावनांचा वाट मोकळी करून दिली.

सुलोचना श्रीशैल कोळी, असे त्या महिलेचे नाव. मूळचे कुंभारीचे असलेले श्रीशैल कोळी हे २२ वर्षांपूर्वी कारखान्यात कामाला लागले. कोळी यांचे तिसरीपर्यंत शिक्षण, दोन भाऊ व एक बहीण असून घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे वयाच्या १८ व्या वर्षी ते कारखान्यात कामाला लागले. त्यांच्या या नोकरीच्या वेतनातून घराला आर्थिक हातभार लागला.

Siddheshwar Sugar Factory Solapur Chimney
Police Force : नामकरण ते निवृत्ती.. 'या' श्‍वानांचा पोलिस दलात वेगळाच थाट; डायट, दिनचर्या आणि बरंच काही..

दरम्यान, विवाहानंतर १५ वर्षांपूर्वी कारखाना स्थळावरील कॉटर्समध्ये त्यांनी आपला संसार सुरू केला. त्यांनी पत्नी सुलोचना यांचेही शिक्षण अवघे चौथीपर्यंतचे. कष्टात पण सुखाचा संसार सुरू असताना श्रीशैल यांचा अपघात झाला आणि त्यांच्या दोन्ही पायामध्ये रॉड बसविल्यात आल्याने त्यांना अपंगत्व आले. त्यांना कारखान्यातील कष्ठाची काम करणे अश्यक्य बनले. तीन छोटी मुले, पत्नी हा संसाराचा गाडा कसा हाकायला? असा प्रश्न त्यांच्या समोर होता.

त्यावेळी आहे त्या परिस्थितीचे धर्मराज काडादी यांच्यासमोर कथन केले. त्यावेळी काडादी यांनी त्यांना शिपाई म्हणून नुसते बसून राहण्याचे काम दिले तर त्यांच्या पत्नीलादेखील नर्सरीतील कामे दिली. काडादी यांच्यामुळे या पती-पत्नीच्या हाताला काम मिळाले. आणि एकमेकांना आर्थिक आधार भक्कम होत गेला.

Siddheshwar Sugar Factory Solapur Chimney
Sangli : लोकसभेपूर्वीच काँग्रेस नेत्यानं टाकला पहिला डाव; भाजप खासदाराला घेरण्याचा प्रयत्न, थेट विचारले 9 प्रश्‍न

दरम्यान, कारखान्याची को-जनरेशनची चिमणी उभी झाल्यानंतर हा संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सुलोचनासह परिसरातील १५ महिलांवर सोपविली होती. दररोज या परिसराची स्वच्छता करत असताना कारखान्याची चिमणी, अनेकांची रोजी-रोटी असलेला कारखाना, हाताला काम दिलेल्या काडादी कुटुंबीयांवर कोळी कुटुंबीयांची अपार निष्ठा. मागील दोन दिवसांपासून महापालिका व पोलिस प्रशासनाने कारवाई मोहीम हाती घेतल्यापासून या कुटुंबीयांच्या डोळ्यासमोर अंधारमय भविष्य दिसू लागले होते.

Siddheshwar Sugar Factory Solapur Chimney
Success Story : वावर हाय, तर पावर हाय! शेतकऱ्यानं 55 गुंठ्यांत घेतलं 45 पोती भुईमुगाचं उत्पादन

शेवटच्या क्षणापर्यंत चिमणी राहील आणि रोजगार असेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. मात्र गुरुवारी दुपारी चिमणी पाडण्याच्या अंतिम टप्प्यात मात्र श्रीशैल कोळी, त्यांची पत्नी सुलोचना आणि तिन्ही मुले घराच्या उंबरठ्यावर बसून चिमणीसोबत आपला संसारही उध्दवस्त होत असल्याचे डोळ्यांने पाहत होते. एकीकडे ते स्वत:शीच पुटपुटत होते तर दुसरीकडे डोळ्यातून पाणी वाहत होते. ज्यावेळी चिमणी कोसळली तेव्हा सुलोचना यांनी एकच टाहो फोडला. चिमणी नाही ओ, माझा संसार पडलाय, माझा आधार गेलाय. चिमणी आमच्यासाठी माय-बाप होती, आता आम्ही कसे जगायचे असा काळीज पिळवटून टाकणारा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.