Solapur : सोलापूरच्या मुंबई-कल्याण बाजारात खळबळ; धंदा चालू न ठेवण्याचा ‘खाकी’वर्दीचा निरोप

आमचा निरोप येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टपऱ्यांमधून उघड धंदा करू नये
solap[ur news
solap[ur news sakal
Updated on

सोलापूर - ‘सकाळ’ ने सोलापूर शहरातील मुंबई-कल्याण सट्टा मटका बाजारावर ‘मटक रे झटका: मलई पाण्यावरची, वाताहत सोलापूरची’ या वृत्तमालिकेद्वारे वृत्तांकन करुन पोलखोल केली. या वृत्तांकनाचे तीव्र पडसाद मटका विश्‍वात उमटले. मटका बुकीवाल्यांनी कारवाईच्या भीतीने बुकी बंद ठेवल्या तर काहींना बुकी बंद ठेवत मोबाईद्वारे आपला धंदा चालू ठेवला.

दरम्यान, आमचा निरोप येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मटक्याचा सट्टा बाजार चालू करू नये, असा निरोप काही पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांमार्फत वसूलांच्या मध्यस्तीने मटका किंग आणि बुकीवाले यांना देण्यात आला. तर काही पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांनी मटका चालू ठेवण्यास दिवसा चांदण्या दाखवू असा सज्जड दम संबंधितास दिल्याचे सांगण्यात आले.

टपऱ्या ‘क्लोज’; मोबाईलवर खेळ ‘ओपन’

सोलापूर शहर आणि परिसरात उघडपणे चालणाऱ्या मटका जुगाराच्या टपऱ्या आणि बुकी आज शनिवारी (ता.१६) बंद असल्याचे चित्र दिसून आले. तथापि, बुकी चालक यांनी मोबाईलच्या साह्याने मटक्याचा धंदा मात्र चालू ठेवला आहे. दरम्यान, आमचा निरोप येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत टपऱ्यांमधून उघड धंदा करू नये, यादरम्यान होणाऱ्या कारवायांना आम्ही जबाबदार नाही, असे सक्तपणे मटका किंगवाल्यांनी टपरीधारकांना सांगितल्याची चर्चा आहे.

solap[ur news
Solapur : ‘एपीएफसी’ पॅनेलमुळे वीजबिलात मोठी बचत; एका योजनेच्या वीजबिलात दरमहा दहा लाखांची बचत

काही मटका किंग पसार

मटका जुगार चालवण्याप्रकरणी कारवाईच्या पार्श्वभूमीवर, आपण पोलिसांच्या हाती लागू, आपणास केव्हाही उचलले जाईल, या भीतीने शहरातील काही मटका किंग सोलापुरातून बाहेर गेले आहेत. संबंधितजण मोबाईलद्वारे संपर्क साधून सोलापूरमधील परिस्थिती जाणून घेत आहेत.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये काही पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत मटका जुगार चालतोय अशी माहिती आहे. दरम्यान, मटका जुगारावरील कारवाया सातत्याने सुरु आहेत. मराठा आरक्षण आंदोलने आणि गणेशोत्सव या पार्श्वभूमीवर, पोलिस व्यस्त राहिल्याने कारवाया थोडा थांबल्या आहेत.

solap[ur news
Solapur: ‘खाकी’ वर्दीच्या हुशारीचा डब्बलगेम; कारवाया दाखविण्याबरोबरच मटका तेजीत ठेवण्यास सहकार्य

मात्र, गणेशोत्सवानंतर कारवायांचे सत्र चालूच राहील. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोणत्याही परिस्थितीत आपण मटका जुगार चालू देणार नाही. मटका चालविणाऱ्यांनी कारवाईच्या भीतीने जागा बदलल्या आहेत. त्याचीदेखील माहिती जिल्ह्याच्या ग्रामीण पोलिस यंत्रणेला मिळाली आहे. अज्ञात आणि गुप्त ठिकाणाहून चालणाऱ्या मटका जुगाराचा बीमोड करण्यासाठी पोलिस यंत्रणा सक्षम आहे. कारवायांचे सत्र चालूच राहील.

शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

solap[ur news
Solapur News : 'ना तहसीलदार, ना मुख्याधिकारी सांगोल्याचा कारभार चालतो रामभरोसे'

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील सातही पोलिस ठाण्यांच्या हद्दींमध्ये चालणाऱ्या मटका जुगारावर कारवाया करण्याचे सत्र सुरु आहे. केलेल्या कारवायांसंदर्भात परवादिवशी निश्‍चितपणाने आकडेवारी देऊ. कारवाईची आकडेवारी देऊनच या विषयावर बोलू.

डॉ.राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()