मंगळवेढा : थकीत वीज बिलावरून वारंवार होणारा खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर पंप योजनेचा लाभ घेवून विज बिल पासून सुटका करून घ्यावी असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले.
त्यांनी तालुक्यातील शिरसी,भाळवणी या गावातील मयत कुटुंबाच्या नातेवाईकाचे सांत्वनासाठी भेटी दिल्या या भेटीदरम्यान काही शेतकऱ्यांनी त्याच्याशी संवाद साधला . त्यांच्या दौऱ्यामध्ये काही गावात शेतकऱ्यांनी पूर्व सूचना न देता महावितरणने वीजपुरवठा खंडित केलेल्या तक्रारी होत्या त्यावर त्यांनीही वरील भाष्य केले माजी.
आमदार परिचारक म्हणाले की सध्या विजेची मागणी वाढली आहे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही त्यामुळे काही शेतकऱ्याकडून आकडे टाकले जातात तर त्यामुळे इतर शेतकऱ्यांना भरमसाठ वीजविले येऊ लागल्यामुळे शेतकरी बिल भरण्यासाठी अडचणी येवू लागल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर परिणाम झाल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यासमोर विज बिल भरण्यासाठी पैसे उपलब्ध होईनात
म्हणून सीएससी केंद्रातून ऑनलाईन मागणी केल्यास त्याला तात्काळ मुख्यमंत्री सौर योजनेतून वीज पुरवठा केला जातो सदरचा वीजपुरवठा दिवसा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर होणार आहे शिवाय रात्रीची शेतकऱ्याला पुरेशी झोप मिळणार आहे याशिवाय केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत व पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना व पंतप्रधान गरीब कल्याण योजनेची माहिती जास्तीत जास्त
लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत जेणेकरून त्यांना केंद्र शासनाच्या योजनेचा लाभ मिळू शकेल व त्या लाभासाठी त्यांना भविष्यात कुठेही पळापळ करावी लागणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन माजी आमदार परिचारक यांनी केले. यावेळी दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर,बसवराज पाटील,पिंटू आळगे,पंडीत माने,दत्तात्रय गायकवाड, महादेव कांबळे,यादवराव शिंदे,पांडुरंग ढगे,सतीश पाटील हे उपस्थित होते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.