Solapur : सोनके- तिसंगी 400 कुसेकने पाणी सोडले हा निव्वळ लोकांची थट्टा; सांगोला तालुक्यात ओढ्यानाल्याना पाणी...

पंढरपूर-सांगोला राजकीय नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?
sonke tisangi
sonke tisangiesakal
Updated on

तिसंगी - तिसंगी-सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरून देण्याचे आश्वासन राजकीय नेतेमंडळी व अधिकारी वर्गानी आंदोलन कर्तासमोर मान्य केले होते. त्यानुसार सोनके तलावामध्ये 400 कुसेस पाणी सोडण्यात ही आले होते. परंतु अधिकाऱ्यांना काही राजकीय दबाव आल्याने ते पाणी कमी करून पुन्हा 100 कुसेक पाणी सोडण्यात आले तर आज मितिस पुर्ण बंद केल्याने आम्हा शेतकऱ्यांवय उपोषण करण्याची वेळ आली आहे. अधिकारी वर्गानी शेतकरी वर्गाची थट्टा लावली आहे. तिसंगी-सोनके तलावावरती अवलंबून असणाऱ्या गावावरती संबंधित अधिकारी नेतेमंडळी वारंवार अन्याय करत आहेत. दुसरीकडे या आवर्तनामध्ये येत नसणारे ओढे-नाले यांना राजरोसपणे पाणी सोडण्यात येत आहे. तलावातील पाणी सांगोला तालुक्याच परिसरातून राजकीय नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सांगोला तालुक्यामध्ये काही भागांमध्ये या आवर्तनामध्ये नसलेले कॅनॉल ओढून आले यालाही पाणी दिले जात आहे. नियमाप्रमाणे सोनके तलाव भरण्याचा नियम असताना सुद्धा या तलावांमध्ये पाणी भरून तो पूर्ण क्षमतेने भरण्यात येत नाही सांगोल्यातील राजकीय नेते मंडळी मात्र आपापल्या परिसरामध्ये पाणी सोडून आतापासूनच आपली पुढील तयारी करण्याच्या मार्गावर दिसत आहे.

तलावा खालील असणारी काही गावे मतदार संघात नसल्याने रिजकिय द्वेशापोटी पाण्यापासुन वंचित राहणार आहेत. तलाव वेळेत भरला नाही तर परिसरातील 11 गावाना दुष्काळाशी सामना करावा लागणार आहे. अधिकारी वर्गास विचारणा केल्यास त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारचे उत्तर येत नाहीत. पाण्याचे नियोजन विचारले असता. राजकीय दबावा सोडले. पाऊस वेळेत न पडल्याने कॅनॉलला आवर्तनाच्या पाण्याची मागणी निर्माण झाली आहे.

sonke tisangi
Nagpur News : आरयूबीसह होणार दोनशे कोटींची कामे; केंद्रीय मंत्री गडकरी नाईक तलाव भुयारी मार्गाचे भूमिपूजन

दुसरी बाजू पाहिली असता पंढरपूर तालुक्यातील आजी -माजी लोकप्रतिनिधी सोनके-तिसंगी तलाव भरून देण्याच्या दृष्टीने कोणतेच पावले उचलताना दिसत नाहीत. पंढरपूर तालुक्यातील वंचित ठरलेला भाळवणी गट नाराज असताना दिसत आहे. दरम्यानचा कालावधीमध्ये 400 कुशकणे पाणी सोडण्यात आले होते. राजकीय मंडळी तलाव परिसरातील शेतकऱ्यांची थट्टा करताना दिसत आहेत.

तिसंगी-सोनके तलावाखालील 11 गावातील शेतकरी वर्गासाठी पुन्हा इनलेट नाला तिसंगी येथे समाधान फाटे याचे उपस्थित शेतकरी वर्गानी उपोषण सुरू केले आहे.

गेली दोन दिवस झाले मी व शेतकरी तलावात पाणी सोडा या मागणीसाठी उपोषण बसलो आहे. पण कोणी राजकीय पुढारी व अधिकारी वर्गाने विचार पुस सुद्दा केली नाही. तिसंगी-सोनके तलावात पाणी सोडल्या शिवाय उपोषण मागे घेणार नाही..

समाधान फाटे, उपोषण कर्ते

sonke tisangi
Satara Politics : दादांची 'दादागिरी' साताऱ्यात चालेल का ? पालकमंत्री पदावरून जोरदार चर्चा ...

सोनके तिसंगी तलाव भरण्यासाठी पंढरपुरातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व राजकीय नेते मंडळी प्रामाणिकपणे प्रयत्न करताना दिसत नाहीत तर दुसरी बाजू पाहिली असता सांगोला तालुक्यातील नियमात बसत नसणाऱ्या सुद्धा कॅनॉल पुढे नाल्यांना पाणी सोडण्याचे काम सुरू आहे हा कुठला न्याय सोनके-तिसंगी तलाव शंभर टक्के भरून देण्यासाठी प्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावा...

गणेश महारनवर युवा शेतकरी सोनके ता. पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.