'भाजपच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही'; आमदार देशमुखांचा प्रणिती शिंदेंवर पलटवार

Subhash Deshmukh vs Praniti Shinde : काँग्रेसच्या सत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे.
Subhash Deshmukh vs Praniti Shinde
Subhash Deshmukh vs Praniti Shindeesakal
Updated on
Summary

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला माढ्यातून उभं राहायचं आहे, एक फेरी मारून या, असे सांगितले.

सोलापूर : भाजप महायुतीच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात एकही जातीय दंगल झाली नाही. उलट काँग्रेसच्या सत्ताकाळातच सोलापूरवर जातीय दंगलीचा कलंक लागला, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आजही लोक सोलापुरात यायला घाबरतात, असा प्रतिटोला सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना लगावला. ते होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील प्रादेशिक पर्यटन केंद्रावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पद्मशाली समाजाच्या अधिवेशनात काँग्रेसच्या खासदार शिंदे यांनी भाजपवर (BJP) दंगली घडविल्याचा आरोप केला होता. त्यावर देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्यासह केंद्रा भाजप महायुतीची सत्ता असताना सोलापूरसह महाराष्ट्रात एकही दंगल झाली नाही. उलट मागच्या पन्नास वर्षांच्या काँग्रेसच्या सत्ताकाळात दंगली झाल्या. सोलापूरवर दंगलीचा कलंक त्यांच्यामुळेच लागला, असा थेट आरोप देशमुख यांनी कोणाचेही नाव न घेता केला. त्यामुळे आजही सोलापुरात यायला लोक घाबरतात, असेही त्यांनी म्हटले.

Subhash Deshmukh vs Praniti Shinde
दलित विद्यार्थ्यांसाठी उघडली 'आयआयटी'ची दारे; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश

आमदार देशमुख यांनी १९९८ पासूनचा आपला राजकीय कारकिर्दीचा आढावा मांडला. मी भाजपचा कार्यकर्ता नसतानाही ज्येष्ठ नेते कै. लिंगराज वल्याळ यांच्यामुळे अनवधानाने राजकारणात आल्याचे त्यां सांगितले. भाजपच्या लोकांनी मला साथ दिली, असे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सांगतात. पण १९९८ आणि २००४ मध्ये काँग्रेसने मला साथ दिली, असे मी मानतो.

Subhash Deshmukh vs Praniti Shinde
Devendra Fadnavis : 'उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर टीका करताना आधी आरशात स्वतःचा चेहरा पाहावा'; फडणवीसांचा टोला

याला काही अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला. २०१९ मध्ये मी सहकारमंत्री होतो. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला माढ्यातून उभं राहायचं आहे, एक फेरी मारून या, असे सांगितले. त्यांच्या आदेशानुसार मी मतदारसंघात फिरलो. मी पळ काढत नाही. राजकारणात पक्षाचा आदेश पाळून मी कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मी पळ काढणारा नव्हे, पक्षादेश मानणारा

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. उमेदवारी न मिळाल्यास आपण बंडखोरी करणार का, या प्रश्‍नावर आमदार देशमुख म्हणाले, माझ्या राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीपासून म्हणजे १९९८ पासून पक्षाने जो आदेश दिला, तो मी पाळला आहे. आजपर्यंत पक्षादेश मानूनच मी कार्यरत आहे. मी कधीही पळ काढला नाही. मी रडका नाही. पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.