सोलापूर : पंढरपूर येथे ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शना-खाली देशी गोवंशाच्या गोमूत्र, शेणखताचा उपयोग करून एकरी १०० टन उसाचे उत्पादन घेण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या प्रयोगावर आधारित दोन लाख एकरातील उसाचे पीक देशी गोवंशाच्या मदतीने घेतले जाणार आहे.
या प्रयोगाबद्दल ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ तथा निवृत्त पोलिस निरीक्षक नानासाहेब कदम यांनी माहिती दिली. भारतीय शेतकऱ्यांनी कृषी कार्यात गेल्या अनेक वर्षांमध्ये अशास्त्रीय, अविवेकी रासायनिक खते व औषधांचा वापर केला आहे. अशास्त्रीय रासायनिक खते व औषधांचा वापर केल्याने भारतीय जमिनीचा कस सेंद्रिय कर्ब कमी झाल्याने व सामू नियंत्रित झाल्याने पिकांच्या एकरी उत्पादनात घट झाली. तसेच रासायनिक खतांच्या किमतीही प्रचंड वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली. गेल्या काही वर्षांमध्ये बिघडलेल्या नैसर्गिक समतोलामुळे उत्पादनाची शाश्वती नाही व भावाची हमी नसल्याने उत्पन्नाचीही शाश्वती राहिली नाही. म्हणून भारतीय शेती व्यवसाय अडचणीत सापडला.
या राष्ट्रीय समस्येतून राष्ट्राला व शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी एका उपक्रमाची मांडणी केली आहे. ‘राष्ट्रीय संपत्ती- जमीन, जल व भारतीय चलन संवर्धनाद्वारे राष्ट्र निर्माण’ या उपक्रमाची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी पंढरपूरची निवड केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात अंमलबजावणी होत आहे. पंढरपूरजवळील या प्रकल्पात देशी गोवंशाचा वापर करून २० एकर शेती कोणत्याही रासायनिक खते, औषधांच्या वापराशिवाय केली आहे. यापैकी १२ एकरात रासायनिक खते व औषधांच्या वापराशिवाय एकरी ८० ते १०० टन ऊस उत्पादन केले आहे.
गो-उत्पादनांच्या मदतीने केलेले यशस्वी ऊस तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी भारत कृषिरत्न पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (ता. ११) सकाळी ११ ते पाच या वेळेत पंढरपूर येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी रोड येथे राज्यस्तरीय ऊस क्रांती तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा होत आहे. जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांच्या बाजूला गुजरातमधील नंद गवळी समाज देशी गोवंशासह राहतो. त्यांच्याकडे अंदाजे १० हजार देशी गोवंश आहे. या गाईंच्या गोमय व गोमूत्राचा उपयोग केल्यास दोन लाख एकर ऊस शेती रसायनमुक्त पद्धतीने करता येते, ही भूमिका राज्यस्तरीय ऊस क्रांती प्रशिक्षण कार्यशाळेत ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांसमोर मांडली जाईल.
- नानासाहेब कदम, समन्वयक, राज्यस्तरीय ऊस तंत्रज्ञान क्रांती कार्यशाळा तथा सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.