सांगोला - चालू पावसाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग ग्रामीण रस्ते अशा १५ नवीन रस्त्यांच्या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून २४ कोटी ४५ लाख रुपये
तसेच नाबार्ड योजनेमधून खवासपूर ते विठलापूर जोडणाऱ्या रोडवरील माण नदीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी १० कोटी ८० लाख रुपये असे एकूण ३५ कोटी २५ लाख रुपयेचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर केले असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
आमदार शहाजी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामांना पुरवणी अर्थसंकल्पात मंजुरी देऊन तातडीने निधीची तरतूद होण्याबाबत पत्र देवून मागणी केली होती. यानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळाला आहे.
यामध्ये दिघंची ते खवासपूर, लोटेवाडी सोनलवाडी, एखतपुर, सांगोला, वाढेगाव, मेडशिंगी, आलेगाव, वाकी घेरडी, वाणी चिंचाळे, भोसे रस्त्यासाठी - ३ कोटी रुपये, प्रस्तावित राज्य मार्ग अजनाळे, यलमर मंगेवाडी, वाटंबरे, राजुरी, हटकर मंगेवाडी, जुजारपूर, जुनोनी, कोळा रस्त्यासाठी - २ कोटी रुपये , बेनुर, जुनोनी, गौडवाडी रस्ता सुधारणा करण्यासाठी - ७० लाख रुपये , सांगोला, इमडेवाडी, लक्ष्मी दहिवडी रस्ता सुधारणे - ३० लाख रुपये, मांजरी,
देवकतेवाडी धायटी, हलदहिवडी, गायगव्हाण ते राज्य मार्ग १४३ ला मिळणारा रस्ता सुधारणे - १ कोटी ५० लाख, बलवडी, चोपडी, बंडगरवाडी, सोमेवाडी, इराचीवाडी, कोळा, कोंबडवाडी ते किडेबिसरी रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे - २ कोटी ७० लाख, जिल्हा हद्द चिंद्यापीर, चोपडी, हातीद, जुजारपूर रस्ता सुधारणा करणे - १ कोटी तसेच जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग अकोला, कोळी मळा, लोणविरे रस्ता सुधारणा करणे - ३ कोटी, महिम ते जैनवाडी रस्ता सुधारणा करणे - १ कोटी,
राज्य मार्ग १२५ ते कडलास (गायकवाड वस्ती) ग्रामीण मार्ग मध्ये सुधारणा करणे - १ कोटी ५० लाख, कडलास पवार वस्ती मेटकर वस्ती ते आलेगाव रस्ता सुधारणा करणे - २ कोटी ५० लाख, भंडीशेगाव ते धोंडेवाडी (ता. पंढरपूर) ग्रामीण मार्ग २८ किमी रस्ता सुधारणा करणे - १ कोटी ५० लाख, कोळा ते मोलमांगेवस्ती रस्ता सुधारणा करणे - ७५ लाख,
चोपडी ते यादव मळा ४ किमी रस्ता सुधारणा करणे - १ कोटी ५० लाख व राजुरी ते प्ररामा ६ रस्ता सुधारणा करणे - १ कोटी ५० लाख असे एकूण २४ कोटी ४५ लाख रुपये तसेच नाबार्ड योजनेतून खवासपूर ते विठलापूर जाणाऱ्या रोडवरील माण नदीवर १० कोटी ८० लाख रुपये नवीन पुलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद केला असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.