पंढरपूर (सोलापूर) : वर्षापासून रखडलेली पोलिस भरती, सैन्य भरती त्वरित सुरु करावी, सर्व स्पर्धा परीक्षा घ्याव्यात, कोरोनामुळे दोन वर्षे वाया गेल्याने विद्यार्थ्यांना वयोमर्यादा वाढवून मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भरती व स्पर्धा परिरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्म फीच्या नावाखाली लुटले जात आहे. सर्व प्रकारची फॉर्म फी फक्त शंभर रुपये ठेवावी, भरतीवेळी विद्यार्थ्याना आवश्यक सर्व कागदपत्रे व दाखले विनामोबदला आणि तातडीने मिळावेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार नायब तहसीलदार मनोज क्षोत्री यांना देण्यात आले. मोर्चात विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शिवाजी पाटील, विजय रणदिवे, शहाजहान शेख, युवराज घुले, अजित बोरकर, सचिन अटकळे, अमर इंगळे, सोमा घोगरे, रायाप्पा हळणवर, दशरथ जवळेकर, आबा खांडेकर आदी सहभागी झाले होते.
राज्य शासनाने मागण्यांची त्वरीत दखल घ्यावी. आम्ही शेतकऱ्यांची मुली आहोत. आम्हाला आंदोलनासाठी मुंबईला यायची वेळ येऊ देऊ नका अन्यथा आम्ही राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील नांगर आणि बैलाच्यासह मुंबईत येऊन तीव्र आंदोलन करु, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी यावेळी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.