प्राचार्यांचे स्पष्टीकरण! 'डाएट'कडे डिसले गुरुजी फिरकलेच नाहीत

परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची क्‍यूआरकोड शिक्षण पध्दती जगभर पोहोचली.
disale-guruji_202102559621.jpg
disale-guruji_202102559621.jpg
Updated on

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांच्याकडील ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी व शिक्षकांना व्हावा, या हेतूने त्यांना "डाएट'वर (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था) प्रतिनियुक्‍ती देण्यात आली. सुरवातीला दोन वर्षांसाठी नियुक्‍ती दिली गेली, त्यांना पुन्हा एक वर्षांची मुदतवाढ मिळाली. मात्र, तीन वर्षांत डिसले गुरुजी "डाएट'कडे एकदाही फिरकले नाहीत, अशी माहिती "डाएट'चे प्राचार्य डॉ. रामचंद्र कोरडे यांनी दिली. (Solapur Marathi News)

परितेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची क्‍यूआरकोड शिक्षण पध्दती जगभर पोहोचली. त्यांना विविध संस्थांनी सल्लागार अशा पदांवर संधी दिली. ग्लोबल टिचर यांनी माझ्याकडे काहींनी पैशांची मागणी केली, असा आरोप केला. माध्यमासमोर बोलताना त्यांना रडू आवरता आले नाहीत, त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचीही भाषा केली. त्यांना सपोर्ट म्हणून अनेक सामाजिक संघटना, शिक्षक व शिक्षक संघटना त्यांच्या पाठिशी उभारल्या. मात्र, त्यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे त्यांच्याकडे आहेत का, त्यांनी माध्यमांसमोर ते का दिले नाहीत, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

disale-guruji_202102559621.jpg
तू माझ्यासोबत राहशील का? म्हणत केला विनयभंग; आरोपीला ७२ तासांत शिक्षा

"डाएट'च्या माध्यमातून 42 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना व दीड हजारांपर्यंत शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, "डाएट'कडे तशी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. मुळात तसे प्रशिक्षण देण्यासंदर्भातील आदेशच "डाएट'ला अद्याप प्राप्त झालेला नाही, असे प्राचार्य कोरडे यांनी स्पष्ट केले.

परंतु, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात माझ्याकडे विचारणा केल्याशिवाय मी काहीही बोलू शकत नाही, अशी भूमिका त्यांनी "सकाळ'च्या माध्यमातून मांडली. दरम्यान, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यासंदर्भात पुढे काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

disale-guruji_202102559621.jpg
तरसाचा शेतकऱ्यावर हल्ला; शेळ्या, कुत्र्यांनी हल्ला करुन केले त्याला ठार

"डाएट'च्या माध्यमातून शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भातील कोणताही आदेश रणजितसिंह डिसले यांच्याकडे नव्हता. तीन वर्षांच्या प्रतिनियुक्‍तीच्या काळात ते कधीच "डाएट'कडे आलेले नाहीत. याबाबतचा रिपोर्ट प्राथमिक शिक्षण विभागाला पाठविला आहे.

- डॉ. रामचंद्र कोरडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

ऑगस्टमध्ये डिसले गुरुजी जाणार अमेरिकेला

फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे अमेरिकेला जाणार आहेत. त्यासाठी त्यांनी रजा मागितली होती, परंतु अर्ज देऊन दीड महिने होऊनही रजा मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला होता. हे प्रकरण शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांनी प्रशासनाला आदेश देऊन रजेचा विषय निकाली काढला. परंतु, डिसले गुरुजी त्या शिष्यवृत्तीसाठी आताच नव्हे तर ऑगस्टमध्ये अमेरिकेला जाणार आहेत. त्यामुळे रजेसाठी माध्यमांसमोर एवढा ड्रामा कशासाठी?, असा प्रश्‍न अधिकारी विचारू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.