सोलापूर : उजनी जल पर्यटनाला १९० कोटी १९ लाख, कृषी पर्यटनाला १९ कोटी ३० लाख, विनयार्ड पर्यटनाला ४८ कोटी २६ लाख, धार्मिक पर्यटनाला २५ कोटी असा एकूण २८२.७५ कोटींच्या सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मंजूर झाला आहे. .मुंबई येथे राज्याच्या मुख्य सचिव सुनीता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या उच्चाधिकार समितीने ही मान्यता दिली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमध्ये हा आराखडा प्रथम सादर झाला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली. .त्यानंतर हा आराखडा उच्चाधिकार समितीकडे पाठवण्यात आला होता. या बैठकीसाठी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी उपस्थित होते.या आराखड्यातील धार्मिक पर्यटनात जिल्ह्यातील पाच मंदिरांचा समावेश आहे. त्यामध्ये करमाळ्यातील श्री कमलादेवी मंदिर, सोलापुरातील श्री सिद्धेश्वर मंदिर- सोलापूर, अकलूज येथील श्री शिवपार्वती मंदिर व शिवसृष्टी, वडवळ (ता. मोहोळ) येथील श्री नागनाथ मंदिर आणि माचणूर (ता. मंगळवेढा) येथील श्री सिद्धेश्वर मंदिराचा समावेश आहे. .Monsoon Tourism : पावसाळ्यात भारतातील 'या' ठिकाणांना भेट देऊ नका, अन्यथा....या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, माहिती फलक, स्वच्छतागृह व विश्रांतीगृह, बैठक व्यवस्था, निवारा शेड, पदपथ, पेव्हर ब्लॉक, कचराकुंडी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ई. त्यासाठी रक्कम रुपये २५ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. पर्यटन धोरणात प्रस्तावीत केलेल्या विविध आर्थिक व बिगर आर्थिक प्रोत्साहनपर बाबींची माहिती स्थानिक इच्छुक व्यावसायिक, उद्योजक, महिलांचे बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट तसेच विविध सेवा पुरवठादार आदींपर्यत प्रभावीपणे पोचविण्यासाठी तसेच त्यांना नियोजित पर्यटन सर्किट मध्ये पर्यटन / पर्यटन पूरक व्यवसाय उभे करण्यासाठी प्रोत्साहन केले जाणार आहे..Solapur : कर्नाटकचा बॅरेज तयार, महाराष्ट्रात सर्व्हेही होईना ; भीमा नदी ,जलसंपदाच्या अपर मुख्य सचिवांकडे प्रस्ताव प्रलंबित .खुडूसला विनयार्ड प्रकल्पआज मान्यता मिळालेल्या आराखड्यातून खुडूस (ता. माळशिरस) येथे विनयार्ड प्रकल्प उभारणे प्रस्तावित करण्यात आले आहे. या प्रकल्पातून पारंपारिक घरे, ट्री हाऊस, वैदिक घरे, साहसी उद्यान, लाकडी शैलीचे घरे, ग्लॅम्पिंग पॉड्स, रेस्टॉरंट, कॉन्फरन्स रूम प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यासाठी ४८ कोटी २६ लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.या प्रकल्पामुळे जिल्ह्यात टूर गाइड, हॉटेल आणि रिसॉर्ट कर्मचारी, अन्न आणि पेय सेवा कर्मचारी, ट्रॅव्हल एजंट, वाहतूक सेवा (बस, कार, टॅक्सी) सुविधा देणारे, विविध कार्यक्रमांचे नियोजन करणारे, मनोरंजनाचे कार्यक्रम करणारे कलाकार / लोक कलाकार, दुकानदार व किरकोळ वस्तू विक्रेते, संग्रहालय आणि वारसा साइट कर्मचारी, संवर्धन कामगार, ग्राहक सेवा प्रतिनिधी, बांधकाम व देखभाल दुरुस्ती कामगार, स्पा आणि वेलनेस कर्मचारी, स्वच्छता सेवा सुविधा देणारे कामगार यांच्यासाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.- कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी, सोलापूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.