मोहोळ : समाजात सध्या हौसेखातर नागरिक जुने फळाचे झाड, पाळीव प्राणी, एखादे वाहन, यांच्यासह लहान मोठ्यांचा वाढदिवस साजरा करतात. मात्र चिखली ता मोहोळ येथील गावकऱ्यांनी सतत 23 वर्षे विना तक्रार सेवा देणाऱ्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर चा बुधवारी साडेचार वाजता केक कापून चक्क वाढदिवस साजरा केला. जिल्ह्यात या उपक्रमाची चर्चा चवीने चर्चिली जात आहे.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील चिखली हे सुमारे पंधराशे लोकसंख्येचे गाव आहे. गावाच्या कडेलाच 100 एम व्ही ए शक्तीचा ट्रान्सफॉर्मर आहे. गावात सुमारे 85 ते 90 अधिकृत वीज जोडण्या आहेत.
प्रत्येक नागरिक अगदी स्वतःच्या लेकरा सारखी ट्रान्सफॉर्मर ची काळजी घेतात. गावकरी या ट्रान्सफार्मर ने 23 वर्षे विना तक्रार वीजपुरवठा केल्याने त्याचा वाढदिवस साजरा करतात. विशेष म्हणजे चिखली हे गाव" विज बिल थकबाकी मुक्त गाव" आहे यामुळे जिल्ह्यात या गावाने वरचा क्रमांक पटकावला आहे.
ट्रान्सफॉर्मर ला पाच अँपियर पेक्षा जादा जाडीची फ्युज वायर वापरली जात नाही. अचानक विद्युत प्रवाह वाढला तर फ्युज उडावी, मात्र ट्रान्सफॉर्मरला धोका होऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या काढ घाल करणाऱ्या फ्युजला व एबी स्विचला वेळच्या वेळी ग्रीसिंग केले जाते.
तसेच विद्युत प्रवाह वाहून नेणाऱ्या तारांना झोळ पडला असेल तर तोही महावितरणच्या कर्मचाऱ्या करवी तातडीने काढला जातो. त्यामुळे ताराला तारांचे घर्षण होऊन ट्रान्सफॉर्मरला धोका होत नाही.
यावेळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित म्हणाले, चिखली गावकऱ्यांनी "ट्रान्सफार्मर चा वाढदिवस" हा उपक्रम राबवून जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. थकबाकी भरून इतर गावांनीही यांचा आदर्श घ्यावा. त्यांनी चिखलीच्या गावकऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी सहाय्यक अभियंता संदीप गावडे, सरपंच बाळासाहेब मेंढे, उपसरपंच सुनंदा माळी, हनुमंत चौधरी, हनुमंत शिरसाट, राजाराम शिरसाट, सज्जन वाघमोडे, कल्याण यादव, मरीबा यादव, नाना खडतरे, दत्तात्रेय माळी, प्रवीण सांगळे, यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझ्या कार्यकाळात ट्रान्सफॉर्मर चा वाढदिवस हा उपक्रम प्रथमच पाहत आहे. हा उपक्रम इतरांना आदर्शवत असून गावकऱ्यांनी विज बिल भरून महावितरण ला सहकार्य करावे, व आपल्या सोयी सुविधा हक्काने घ्यावात. विकास पुरी------
जनसंपर्क अधिकारी, महावितरण परिमंडल बारामती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.