What is Polygamy
मुंबई : मुंबईतल्या पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एकच धुरळा उडाला. सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी चालली. जोरदार गाजली.
या दोघींना मूर्खात काढून झालं. त्या पोराची कशी मज्जा आहे, याच्यावर चर्वितचर्वणं झाली. ते तिघे प्रसिद्धीसाठी हा स्टंट करतायत, अशी मतं व्यक्त झाली.
त्यांच्या लग्नात गेलेले लोक एखाद्या खास समारंभाला गेल्यासारखे कृतकृत्य वगैरे झालेले दिसले.
सगळा मीडिया त्यांच्यामागे धावला. इतक्यात कुठूनतरी त्यातल्या नवरदेवाची पहिली पत्नी आहे, अशी बातमी फुटली. एकच कल्ला झाला.
पण यानिमित्ताने आणखी एक मुद्दा सुप्तपणे चर्चेत येत होता. तो म्हणजे पॉलिगामी.
या बातमीवरील सगळीकडच्या कमेंट पाहिल्या तर लोकं त्यांना नावं ठेवत होती. पण त्यांच्याविषयी एक छुपी असूया लोकांच्या मनात दिसली.
अगदी कोणत्याही न्यूज पोर्टलच्या सोशल मीडियावरची ही बातमी पाहिलीत तर पुढे पुढे चर्चेला बहर आलेला दिसून येईल.
असं का झालं?
भारतीय म्हणून आपल्याला कायमच पॉलिगामी अर्थात एकापेक्षा अधिक जोडीदार असणं या कन्सेप्टबद्दल उत्सुकता आहे.
खरंतर भारतच का जगभरात हा विषय कायम चर्चिला जातो.
साहजिकच आहे, एकापेक्षा अधिक जोडीदार असण्यामुळे कदाचित वंशसातत्याचं नैसर्गिक उदि्दष्ट लवकर साध्य होण्याच्या शक्यता असतात त्यामुळे निसर्गाला त्यात काही वेगळं वाटत नाही. माणूस सोडल्यास इतर बहुतांश प्राण्यांमध्ये, प्रजातींमध्ये हे सहज आढळतं.
त्यातच आपली सो कॉल्ड नैतिक बंधनं पॉलिगामीला किंवा एकापेक्षा अधिक जोडीदार असण्याला विरोध करतात. आपलं सामाजिक पर्यावरण या परीघाबाहेर जाण्यास अथवा त्याचं समर्थन करण्यास विरोध करतं त्यामुळेच की काय, जे बंधनकारक त्याविषयीच अधिक कुतुहल, अधिक उत्सुकता दाटलेली दिसते.
पॉलिगामी नैसर्गिकच
अनेक तज्ज्ञ, अभ्यासक म्हणतात, पॉलिगामी अवस्था ही पूर्णत: नैसर्गिक आहे.
मुळात माणसाचं कामजीवन इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळं आहे.
विवाहसंस्थेने आपल्यावर काही बंधनं घातली आहेत. पण म्हणून माणसाचं पॉलिगॅमस नसणं हे अनैसर्गिक ठरत नाही.
उलट आपलं वंशसातत्य वाढवण्याच्या शक्यता पॉलिगामी वाढवत असल्याने त्यामागे या आदिम प्रेरणाही असतीलच.
लोक एकापेक्षा जास्त जोडीदार का निवडतात, यामागे अनेक कारणं असू शकतात. कधी भावनिक, शारीरिक असतात. आर्थिकही असू शकतात. पण त्याची किंमतही द्यावी लागते.
या नात्यांच्या बाबतीत बोलताना त्यातील पुरुषाची काय मज्जा आहे, अशीच एक भावना दिसते. पण तसं नसतं.
स्त्री आणि पुरुष दोघेही त्या नात्यात असतात त्यामुळे त्याचा सगळाच ताण किंवा किंमत दोघांना द्यावी लागते. कधी ती भावनिक असते कधी आर्थिक असते. पण ती दिल्याशिवाय कुणाचीच सुटका नसते.
आपल्याकडच्या पुरुषप्रधान संस्कृतीमुळे कदाचित पुरुषाला त्या सगळ्यातून सुटणं सोपं असतं. तरीही दोघांना कोणत्या ना कोणत्या रुपांत या अधिकच्या नात्यातल्या असुरक्षिततेचा, अस्वस्थततेचा सामना करावाच लागतो.
अर्थात ही किंमत आणि त्या नात्यातून मिळणारं समाधान यातलं गुणोत्तर समाधानाच्या बाजूकडे किंवा फायद्याच्या बाजूकडे झुकणारं अधिक असू शकतं. त्यामुळेच दोघं त्याला तयार होत असावेत, असा एक निष्कर्ष ढोबळमानाने मांडला जातो.
अखेर, या सगळ्या गोष्टी कोणत्या उत्पादनाविषयक नाहीत तर जित्याजागत्या मनुष्यप्राण्याबद्दल आहेत. त्यामुळे प्रत्येक उदाहरणादाखल त्यातली परिस्थिती आणि कारणे बदलत जातात.
डॉक्टर काय म्हणतात?
डॉ. शंतनू अभ्यंकर म्हणतात, ''एकापेक्षा अधिक जोडीदार करण्याची उर्मी नैसर्गिक आहे. एक पती/पत्नी व्रत हे माणसानं शोधलेली सोय आहे.
अशी उर्मी स्त्री आणि पुरुष दोघांतही आहे, पण पुरुषात अधिक प्रबळ आहे.
उत्क्रांतीदृष्ट्या अधिकाधिक संतती होऊ देण्यात पुरुषाचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे
तर झालेली अधिकाधिक संतती निगुतीने सांभाळण्यात स्त्रीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे.''
रिंकी-पिंकीनी का केलं अतुलशी लग्न?
मुंबईतील कांदिवली येथील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींनी माळशिरस तालुक्यातील अतुल बरोबर लग्न केलं होतं.
पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणी असून त्यांना लहानपणापासून एकमेकींची फार सवय आहे. त्या एकमेकींपासून लांब राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींच्या वडिलांचे निधन झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई या तिघी आजारी होत्या. अतुलने त्याच्या टॅक्सीतून त्यांना रुग्णालयात नेले. त्यांची सर्वार्थाने काळजी घेतली.
ही काळजी आणि आपलेपणा यामुळे पिंकीला अतुल आवडू लागला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
परंतु या दोघी बहिणी कधीच वेगळ्या राहिल्या नव्हत्या त्यामुळे आईच्या आणि अतुल याच्या कुटुंबीयांच्या संमतीने दोघींनीही अतुल याच्यासोबत विवाह करण्याचा निर्णय घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.