यंदाची सत्र परीक्षाही ऑनलाईनच घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
सोलापूर : ओमिक्रॉन (Omicron) व कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढू लागल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (Solapur University) सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन (Online exams) घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 24 जानेवारीपासून अभियांत्रिकीची (Engineering) तर 21 फेब्रुवारीपासून इतर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पार पडतील, असे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाअंतर्गत 110 महाविद्यालये आहेत. विद्यापीठातील 45 नियमित अभ्यासक्रमांसाठी एक लाखांपर्यंत विद्यार्थी प्रवेशित आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने आगामी सत्र परीक्षा ऑफलाइन घेण्याचे नियोजन विद्यापीठाने केले होते. मात्र, नववर्षाच्या सुरवातीलाच कोरोना (Corona) व ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वाढल्याने विद्यापीठाने तो निर्णय बदलला. आता सर्वच विद्यार्थ्यांना घरबसल्या सत्र परीक्षा देता येणार आहे. पारदर्शक परीक्षेसाठी प्रॉक्टरिंग प्रणाली वापरली जाते, परंतु विद्यापीठाने त्याबद्दल काहीच स्पष्ट केलेले नाही. तरीही, विद्यापीठाने परीक्षेचा कालावधी कमी करून तो आता एक तास केला आहे. मार्च 2020 पासून कोरोनाचे संकट दूर होऊ शकलेले नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग अधिक असल्याने रुग्णवाढ मोठी आहे. या पार्श्वभूमीवर शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद करावी लागली. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेचे नियोजन...
- विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दोन तासांतील एक तास निवडावा
- प्रत्येक विषयांची प्रश्नपत्रिका असणार 50 प्रश्नांचीच
- प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी असेल केवळ एक तासांचाच अवधी
- अभियांत्रिकीच्या जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांची प्रथमत: तर इतर अभ्यासक्रमाची परीक्षा पुढील टप्प्यात
पारदर्शकतेसाठी काहीही...
ऑनलाइन प्रश्नपत्रिका सोडविताना हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, कोणीही प्रश्नांची उत्तरे एकमेकांना अथवा पुस्तकात पाहून लिहू नये म्हणून प्रॉक्टरिंग प्रणालीचा वापर केला जातो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने त्या प्रणालीचा वापर केलेला नाही. परंतु, तसे गैरप्रकार टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकेवरील उत्तरांची सोडवणूक करताना विद्यार्थी एका पेजवरून दुसऱ्या पेजवर गेल्यास, त्याला पुन्हा मागील पानावरील उत्तरे सोडविता येणार नाहीत, असे विश्वसनिय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. त्याबद्दल परीक्षा नियंत्रकांनी काहीच प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.