काय सुरु, काय बंद? : जाणून घ्या सोलापुरातील स्थिती

corona unlock
corona unlock
Updated on
Summary

शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय रविवारी महापालिका आयुक्‍तांनी घेतला.

सोलापूर : अनलॉकच्या (Unlock) निकषांप्रमाणे शहरातील रुग्णसंख्या व उपलब्ध ऑक्‍सिजन बेडची (Oxygen bed) संख्या पुरेशी असल्याने शहरातील निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्याचा निर्णय रविवारी महापालिका आयुक्‍तांनी घेतला. त्यानुसार हॉटेल, रेस्टॉरंट, क्रीडा, मनोरंजन, मॉर्निंग वॉक, अंत्यसंस्कार पूर्वीप्रमाणे सुरू राहतील, असेही त्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.(solapur-unlocking-need-to-know-what-things-started-and-closed)

corona unlock
दिलासादायक! सोलापूर जिल्ह्यातील दीड लाख रुग्णांनी कोरोनाला हरविले

राज्यातील दुसऱ्या लाटेत लागू केलेले निर्बंध शिथिल करताना संबंधित शहर-जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट आणि त्याठिकाणी असलेली ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता असे निकष लावले होते. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यात सोलापूर शहरातील रुग्ण व बेडची उपलब्धता पाहून काही निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, आता रुग्णसंख्या पूर्णपणे आटोक्‍यात आल्याने शहरातील बरेच निर्बंध पूर्णपणे शिथल करून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू करण्याचा निर्णय महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी घेतला. परंतु, नागरिकांना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असून नियम मोडणाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच दंड भरावा लागणार आहे. दंड वसुलीचे अधिकार वसुली कारकून, आरोग्य निरीक्षक, विभागीय अधिकारी, सहायक आयुक्‍त, पोलिस नाईक यांना असतील, असेही आयुक्‍तांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

corona unlock
रूग्ण घटल्याने 22 हजार बेड शिल्लक!  'म्युकरमायकोसिस'चा प्रादुर्भाव नियंत्रणात

नव्या आदेशानुसार "यांना' परवानगी

- खासगी, शासकीय कार्यालयांमध्ये शंभर टक्‍के उपस्थिती

- अंत्यसंस्कारासाठी कोणतीही मर्यादा नसणार; पूर्वीप्रमाणे अंत्यविधी होतील

- दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, सार्वजनिक ठिकाणे, मॉनिंग वॉक नियमितपणे सुरू राहतील

- क्रीडा, मनोरंजन, जीम, मॉल्स, थिएटर, नाट्यगृहे देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी

- सलून, स्पा, ब्युटी पार्लर, बससेवा, मालवाहतूक नियमितपणेच सुरू राहील

corona unlock
महेश कोठेंचा मंगळवारी राष्ट्रवादीत प्रवेश?

शहराची रुग्णसंख्या प्रथमच एक अंकी

शहरातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे आटोक्‍यात आली असून, पहिल्या व दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद रविवारी झाली. दोन हजार 435 संशयितांमध्ये अवघे सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रभाग क्र. दोनमध्ये दोन, सात, दहा, 24 व 25 या प्रभागांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. तर भवानी पेठेतील 25 वर्षीय युवकाचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रविवारी शहरात एका मृत्यूची नोंद झाली.

corona unlock
सप्टेंबरमध्येच संयुक्‍त पूर्व परीक्षा! मुंबईतील पावसानंतर आयोगाची सावध भूमिका

सोलापूर ग्रामीण तिसऱ्या टप्प्यातच

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्यातील बाजारपेठा अनलॉक केल्या जात आहेत. त्यासाठी त्या-त्या जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागातील (प्रशासकीय घटक) कोरोना स्थितीचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. कोरोना स्थितीनुसार निर्बंधाचा टप्पा निश्‍चित केला जातो, अनलॉकच्या सवलतीचा लाभ दिला जातो. सोलापूरचा ग्रामीण भाग तिसऱ्या टप्प्यातच असल्याने सध्या असलेल्या सवलतींना पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

corona unlock
दोन्ही लाटेतील निर्बंध शेतकऱ्यांच्या मुळावर!

4 ते 10 जून या आठवड्यातील सोलापूरच्या ग्रामीण भागातील कोरोनाचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट हा 5.10 टक्के राहिला आहे. या कालावधीतील ऑक्‍सिजन बेडस व्यापलेल्याची टक्केवारी 20 टक्के आहे. शासनाच्या निर्देशानुसार सोलापूरचा ग्रामीण भाग हा तिसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट झाला आहे. यापूर्वी सोलापूरचा ग्रामीण भागा हा तिसऱ्या टप्प्यातच होता. त्यामुळे 7 जून रोजी अनलॉकच्या ज्या सवलती ग्रामीण भागाला दिल्या होत्या, त्याच सवलती पुढील आदेश होईपर्यंत कायम ठेवल्या जाणार आहेत. या सवलती कायम ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी 12 जून रोजी घेतला आहे.

corona unlock
Solapur University : 60 हजार विद्यार्थी देणार ऑनलाइन परीक्षा

राज्यातील जिल्ह्याच्या कोरोना स्थितीचा आढावा दर आठवड्याला घेतला जात आहे. त्या आठवड्यातील स्थिती पाहून त्या जिल्ह्यातील प्रशासकीय घटकाचा टप्पा निश्‍चित केला जातो. त्या टप्यानुसार निर्बंध आणि सवलती याबाबतचा निर्णय घेतला जात आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील 4 ते 10 जून या आठवड्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत 12 जूनला सायंकाळी 6 वाजता सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली होती. (solapur-unlocking-need-to-know-what-things-started-and-closed)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.