Solapur : एसटी कामगारांसह प्रकल्पाची पळवा पळवी पथनाट्यात

वेदांत प्रकल्प पळवापळवीवरून भिकारी या पथनाट्याचे विद्यार्थ्यांकडून सादरीकरून
Solapur Damaji College student street play
Solapur Damaji College student street play
Updated on

मंगळवेढा :- एसटी कामगार,बेरोजगार, शेतकरी प्रश्नासह व मोर्चातून काहीच साध्य होत नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी शासनाकडे भीक मागावी लागते. वेदांत प्रकल्प पळवापळवीवरून भिकारी या पथनाट्यातून दामाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी युवा महोत्सवातून राज्यकर्त्यांना जागे करण्याचा प्रयत्न केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सव दलितमित्र कदम गुरूजी शास्त्र महाविद्यालयाच्या पटांगणात पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली.त्यामध्ये 33 संघानी सहभाग घेतला. पथनाट्यातून राज्यातील सत्ता बदलाच्या नाट्यसह, शेतकरी प्रश्न, बेरोजगारी,प्रकल्प पळवा पळवी, सत्ता बदलाचे नाट्य,महिलांचे प्रश्न, स्त्रीभ्रूण हत्या, वृक्षतोड, राज्यकर्त्याकडून होत असलेल्या तरुणांचा वापर,राजकीय नेत्याकडून जनतेला भडकवणारे बोंगा,हनुमान चालीसा, प्रशासनातील अधिकाऱ्याकडून जनतेची होत असलेली हेळसांड,भष्ट्राचार असे मुद्दे समोर आणून या विषयावर तरुणांनी पथनाट्यातून भाष्य केले.

दामाजी महाविद्यालयाच्या गायत्री कदरकर,श्रद्धा वाकडे सुशील कदम प्रियांका माळी स्मिता चौखंडे जमुना तोंडसे भगवान वाघ संघर्ष कांबळे स्वप्नील सावंत दिनेश माने या विद्यार्थानी 'भिकारी, या पथनाट्यातून एस टी कामगाराचा प्रश्न,वेदांत प्रकल्पाची पळवा-पळवी,मोर्चातून प्रश्न सुटत राज्यकर्त्याचा प्रश्न सुटतो, कांद्याचा वांदा ,सोयाबीनचे भाव पडले,साहेब कधी तरी येवून बघा शेतकय्राच्या बांधावर,बेरोजगारांच्या नावाखाली लोकशाहीला धारेवर धरले जात आहे.

सध्याच्या बदलत्या राजकीय कुरघोडीवर वालचंद कॉलेज आर्ट सायन्स सोलापूरच्या विद्यार्थ्यांनी हाताला घड्याळ जड झाले. त्यात बाण निशाणावर लागेना,त्यात कमळाबाईने लावलीय आम्हाला ई डी म्हणजेच याड लावले,आता खरं सांगायचं आम्हालाच कळेना कोणाकडे जावं या भाषेत भाष्य केले. आ. शहाजी बापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगर याचा देखील प्रभाव युवा महोत्सवाच्या पथनाट्यात दिसून आला.

बी.पी.सुलाखे काॅमर्स काॅलेज बार्शी च्या संघाने भारत माझ्या बापाचा देश आहे या विषयावर पथनाट्यातून लोकांची डोळे उघडत उपस्थितांची मने जिंकली.सोशल महाविद्यालय सोलापूरच्या संघाने पैशाने मत नाही संविधानाला विकताय असे सांगत जातीभेद नष्ट करण्याचे सांगत सध्या संविधानाचे पंख छाटले,मतदार पैशावर,जेवणावर मत विकत आहे,भारत विद्यालय जेऊरच्या संघाने शेतकय्राच्या प्रश्नावर आवाज उठविला, लोकशाही नावालाच, राफेल बाहेर गेला, खेकड्याने धरण फोडल्याचे उदाहरण देत मोठ्या शहरातील तुंबलेल्या गटारी बेरोजगाराच्या प्रश्नावर प्रहार करून सध्याच्या राजकीय परिस्थितीत होत असलेल्या आरोप प्रत्यारोपात सर्वसामान्य माणूस व त्याचे प्रश्न विसरत चालण्याचा पथनाट्यातून उपस्थित केला.

शिवाजी महाविद्यालय बार्शीच्या संघाने आळीमिरी गुपचिळी या पथनाट्यातून गुजरातमधील गोध्रा हत्याकांडला आरोपीला मोकाट सोडून दिले, छत्तीसगडमधील गरिबाच्या हक्कासाठी लढणाऱ्या तरुणीला मारून टाकणे, राजस्थानमध्ये अस्पृश्यतेच्या कारणावरून पिण्याच्या पाण्यासाठी मृत्यूच्या दारात ढकलणाऱ्या सध्याच्या समाजावर त्यांनी जोरदार प्रहार केला त्यामध्ये जातिवाद, धर्मवाद,भाषावाद दहशतवाद या विषयावर पथनाट्यातून आवाज उठवला दयानंद कॉलेज सोलापूरच्या संघाने वृक्षतोडीने पर्यावरणाची होत असलेल्या हानीवर प्रबोधन केले,कदम गुरूजी शास्त्र महाविद्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सादर पथनाट्यातून सादर केला. सोलापूर विद्यापीठाचा आधिविभागाने आजादी का अमृत महोत्सव हे पथनाट्य साजरे करून उपस्थिताची मने जिंकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.