Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?

Eknath shinde Vs Bjp : तानाजी सावंत यांची आरोग्यमंत्री म्हणून वर्णी लागली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा गट बांधण्यास सुरुवात केली.
Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?
Solapursakal
Updated on

Political News : 10 सकाळ वृत्तसेवा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने मतदारसंघात चाचपणी करण्यास सुरुवात झाली असून भैरवनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी देखील या विधानसभेच्या दृष्टीने करण्यास सुरुवात केली आहे.

तालुक्याच्या दक्षिण भागातील लवंगीत आरोग्यमंत्री तानाजी सावंत,अध्यक्ष शिवाजीराव सावंत,उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी भैरवनाथ युनिट 3 साखर कारखाना काढून रोजगार निर्मिती व ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लावला. परंतु कारखानदारी बरोबर त्यांनी भोसे जिल्हा परिषद गटातील त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमातून आपले राजकीय प्रस्थान बसवण्यास सुरुवात केली.

Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?
सोलापूरमधून प्रणिती शिंदे तर माढ्यातून मोहितेंचा विजय

त्यामुळे ते भोसे जिल्हा परिषद गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून अधिक चर्चा होती परंतु जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर टाकल्यामुळे ती चर्चा थांबली आहे अशा परिस्थितीत राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर तानाजी सावंत यांची आरोग्यमंत्री म्हणून वर्णी लागली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे च्या नेतृत्वाखालीच शिवसेनेचा गट बांधण्यास सुरुवात केली.

अशा परिस्थितीत तालुक्यातील आरोग्य सेवेला वाव देण्याच्या दृष्टीने ग्रामीण रुग्णालयातील वाढीव खाटा, निंबोणी ग्रामीण रुग्णालय मंजूर केले तर नंदेश्वर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूरीचा स्वतंत्र आदेश काढला त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्याचा आकांक्षा स्पष्ट होऊ लागल्या या मतदारसंघातून आ. समाधान आवताडे हे भाजपचे संभाव्य दावेदार मानले जातात अशा परिस्थितीत सध्या भाजपमधून प्रशांत परिचारक यांनी देखील आपल्या गटाला निवडणूक लढवण्याचे संकेत दिले परंतु अनिल सावंत यांनी देखील चाचपणी करण्याच्या दृष्टीने त्यांनी त्रयस्थ संस्थेच्या माध्यमातून सर्वेक्षणाला सुरुवात केली.

Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?
Solapur : घातक ई-सिगारेटची सोलापुरात छुपी विक्री; अनेक आजारांना निमंत्रण, उत्पादनासह आयात-निर्यातीवरही बंदी

त्या सर्वेक्षणामध्ये महाविकास आघाडीतून तुतारी चिन्ह या मतदारसंघातून यशस्वी होईल का ? स्वतंत्र लढल्यास निवडून येऊ शकतो का ? कोणत्या पक्षाची उमेदवार यशस्वी होईल ? शिवाय कोणाबरोबर युती करून लढल्यास अधिक फायदा होईल.

यासह अनेक प्रश्नावली घेऊन त्यांनी सर्वेक्षण सुरू आहे त्यामुळे ते देखील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे मात्र सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत त्यामुळे महायुतीत जागाही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना सध्या तरी भाजप उमेदवाराचा प्रचार करावा लागणार असे दिसत असले तरी स्वतंत्र लढण्याची वेळ आली तर काय करायचे या दृष्टीने त्यांची ही चाचपणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे

Solapur: मतदारसंघ एक, भाजप अन् शिंदे दोघेही उत्सुक सोलापुरात नक्की काय आहे राजकीय स्थिती?
Solapur : महामार्गांचा शेतजमिनींवर घाला ; तीव्र विरोध असूनही भू-संपादनाचा घाट , ११.२५ हजार एकर जमिनी जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.