Solapur News : साठवणूक क्षमता वाढविल्यास सुरळीत पाणीपुरवठा जादा क्षमतेच्या २५ जलकुंभांचा प्रस्ताव एमजीपी’कडे

जलकुंभ उभारणीसाठी ‘अमृत-दोन’ अंतर्गत २५ जलकुंभासाठी ३६ कोटींचा प्रस्ताव ‘एमजीपी’कडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्तावित आहे.
Solapur
Solapursakal
Updated on

सोलापूर : शहराच्या वाढत्या विस्तारानुसार, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याकरिता पाण्याची साठवणूक क्षमताही वाढविण्याची गरज आहे.

शहरातील एकूण ६१ पैकी ३० जलकुंभ निकामी झाले आहेत. ते पाडून नव्याने वाढीव क्षमतेचे जलकुंभ उभारणीसाठी ‘अमृत-दोन’ अंतर्गत २५ जलकुंभासाठी ३६ कोटींचा प्रस्ताव ‘एमजीपी’कडे तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्तावित आहे. मात्र, ‘हर घर नल’ ही योजना पूर्णत्वास गेल्याशिवाय नवीन जलकुंभाला निधी मिळणे अवघडच आहे.

महापालिका प्रशासनासमोर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि महसूली उत्पन्न वाढविणे ही दोन मोठी आव्हाने आहेत. सध्या सुरू असलेली समांतर जलवाहिनी आणि अमृत दोन अंतर्गत प्रस्तावित असलेला ५३२ कोटींचा प्रस्ताव शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी हातभार लावणार आहेत.

Solapur
Solapur News : पाच गुंठ्यांची करता येणार आता खरेदी-विक्री

अमृत दोनच्या प्रस्तावानुसार, निधी मिळण्याकरिता ‘हर घर नल’ योजना प्रभावीपणे राबवून शहरातील सार्वजनिक नळ पूर्णतः: बंद करावे लागणार आहेत. सार्वजनिक नळ बंद करणे हे केंद्र शासनाने काढलेल्या ३२ त्रुटींपैकी एक आहे. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांच्या कार्यकाळात शहराचे वॉटर ऑडिट केले होते.

त्यानुसार, शहरातील वितरण व्यवस्था, पाणी गळती, जीर्ण झालेल्या जलवाहिन्या व जलकुंभ यांचा सर्व्हे करून शहर पाणीपुरवठ्याचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार, शहरात असलेल्या जलकुंभांची क्षमताही वाढविणे आणि जीर्ण झालेले जलकुंभ पाडण्याबाबतचाही अहवाल समाविष्ट होता.

Solapur
Solapur Crime News : माजी आमदारपुत्राची २५ लाखांची फसवणूक

शहरात एमबीआर, जीएसआर आणि एचएसआर अशा तीन प्रकारात पाणी साठवणुकीसाठी सध्या शहरात एकूण ६१ टाक्या आहेत. उजनी धरणातून शहराला प्रतिदिन आवश्यक असलेल्या गरजेपेक्षा अधिक पाणी उचलले जाते. परंतु, गळतीचे प्रमाण ४२ टक्क्यांपर्यंत असल्याने पाणी असूनही शहर तहानलेलेच आहे.

Solapur
Solapur News : कर विभागातील फायलींना फुटले पाय; डबल खरेदीला महापालिकेकडून प्रोत्साहन

त्याचबरोबर तीस वर्षांपूर्वी बांधलेले जलकुंभ आता निकामे झाले आहेत. तसेच या जलकुंभांची पाणी साठवणुकीची क्षमताही वाढत्या शहराला अपुरी पडत आहे. साठवणुकीची क्षमता कमी असल्याने जलकुंभांवरून वेगवेगळ्या भागांत होणारा पाणीपुरवठाही कमी-अधिक प्रमाणात होतो.

शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाण्याचे समान वाटप व्हावे, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजनांमध्ये अधिक क्षमतेच्या जलकुंभांची उभारणी हा पहिला टप्पा असणार आहे. परंतु, या प्रस्तावाला वर्ष लोटले असले तरी तो अद्याप तांत्रिक मान्यतेसाठी एमजीपीकडे प्रस्तावित आहे. हर घर नल ही योजना शंभर टक्के पूर्ण झाल्याशिवाय महापालिकेला निधी मिळणे दुरापास्तच आहे.

शहराची २०५२ ची लोकसंख्या गृहीत धरून अमृत दोन अंतर्गत ५३२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे आहे. सध्या हा प्रस्ताव तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. यामध्ये २५ जलकुंभ उभारण्यात येणार आहेत. शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी हातभार लागणार आहे. लवकर शासन स्तरावर हा विषय मार्गी लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.