सोलापूर : कार्तिक एकादशीसाठी आज रात्री दहाच्या दरम्यान उजनी धरणातून भीमा नदीत चार हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांना पिण्यासाठी, चंद्रभागेत स्नान करण्यासाठी हे पाणी सोडण्यात आले आहे.
नदीत सोडलेले पाणी पंढरपूरला पोहोचण्यासाठी तीन दिवस लागण्याची शक्यता आहे. लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धिरज साळे म्हणाले, नदीत सोडलेले पाणी पंढरपूरला वेळेत जावे यासाठी नदी काठचा विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. पंढरपुरात पाणी पोहोचल्यानंतर नदीतून पाणी सोडणे बंद केले जाणार आहे. नदीत पाणी सोडण्यापूर्वी धरणात ४४ टक्के पाणी साठा होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.