Solapur Weather Update : दिवसा कडक ऊन, रात्री बोचरी थंडी; स्वाती नक्षत्राला सुरवात, पावसाची प्रतीक्षा कायम

गेल्या दोन दिवसापासून सोलापूर शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बोचरी थंडी पडू लागली
solapur weather update climate change agriculture health issues imd marathi news
solapur weather update climate change agriculture health issues imd marathi newsSakal
Updated on

सोलापूर : गेल्या दोन दिवसापासून सोलापूर शहर व परिसरात रात्रीच्या सुमारास बोचरी थंडी पडू लागली आहे. सध्या दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे संमिश्र वातावरण सध्या तयार झाले आहे.

दिनांक ११ ऑक्टोबर रोजी सूर्याचा चित्रा नक्षत्रात प्रवेश झाला होता. चित्रा नक्षत्रातील पावसाने घोर निराशा केली आहे. या नक्षत्रात पावसाने हजेरी न लावल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. आजपासून सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश झाला आहे. या प्रवेशाचे वाहन घोडा आहे. घोडा वाहन असताना पाऊस फारसे हजेरी लावत नसल्याचा आजपर्यंत अनुभव आहे. त्यामुळे या नक्षत्रातील पावसाबद्दलही साशंकता व्यक्त होत आहे.

सोलापूरच्या तापमानाचा पारा सध्या ३६ ते ३७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागले आहे. वाढत्या तापमानामुळे दिवसा कडक ऊन, उन्हाचा चटका आणि रात्री गुलाबी थंडी पडत आहे. या संमिश्र वातावरणामुळे अनेकांना सर्दी, पडसे, खोकले, अंगदुखी यासारखे विकार उद्भवू लागले आहेत.

सोलापूर जिल्हा हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पावसाअभावी जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पेरणीसाठी आवश्यक असलेला परतीचा पाऊस सोलापूर जिल्ह्यात न झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वच चिंतेत आहेत. यंदा पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातून खरीप गेला आहे. खरिपा पाठोपाठ आता रब्बीही जाण्याची दाट शक्यता आहे.

पावसाचे शेवटचे नक्षत्र

आजपासून सुरू झालेले स्वाती नक्षत्र हे यंदाच्या पावसाळ्यातील शेवटचे नक्षत्र आहे. ‘पडतील स्वाती तर पिकतील मोती’ ही म्हण सोलापूर जिल्ह्यात खूप प्रसिद्ध व प्रचलित आहे. रब्बीच्या पेरण्या झाल्यानंतर स्वाती नक्षत्रातील पावसावर पिकांना जीवदान मिळते. यंदा तर रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. यंदा स्वाती नक्षत्रातील पावसाने हजेरी लावल्यास किमान जनावरांच्या चाऱ्याचा, ऊसाचा प्रश्‍न तात्पुरता सुटणार असल्याने या नक्षत्रातील पावसाकडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.