Solapur : ‘सकाळ’कडून दर्जेदार समाजव्यवस्था निर्मितीचे कार्य; पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी; महूद येथे तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम

नुकताच गणेशोत्सव संपन्न झाला असून, लवकरच नवरात्र महोत्सव येतो आहे.
solapur
solapursakal
Updated on

महूद - सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून पत्रकारिता करणारे ‘सकाळ’ दर्जेदार समाजव्यवस्था निर्माण करण्याचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी विविध उपक्रम राबवीत असलेल्या ‘सकाळ’च्या पोलिसांसाठीच्या तंदुरुस्त बंदोबस्त या उपक्रमामुळे आमच्यावरील ताण नाहीसा झाला असून, पुन्हा नव्याने चांगले काम करण्याची प्रेरणा मिळत आहे, असे विचार सांगोल्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

नुकताच गणेशोत्सव संपन्न झाला असून, लवकरच नवरात्र महोत्सव येतो आहे. या पार्श्वभूमीवर महूद येथे ‘सकाळ’ आणि महूद येथील गुरुदेव प्रसारक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून पोलिस कर्मचाऱ्यांसाठी तंदुरुस्त बंदोबस्त उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक कुलकर्णी बोलत होते.

कार्यक्रमास उद्योगपती चंद्रशेखर ताटे, माजी उपसरपंच दिलीप नागणे, डॉ. शरद नागणे, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र राजुलवार, केदारनाथ भरमशेट्टी, कैलास ढवणे, ग्रामपंचायत सदस्य यशवंत खबाले, संजय चव्हाण, महेंद्र बाजारे, अंगद जाधव, दीपक चव्हाण, ॲड. विजय धोकटे, जयवंतराव नागणे, भाजपचे नवनाथ भोसले, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभिषेक कांबळे, उमेश पाटील,

solapur
Solapur : शिधा ‘आनंदा’चा, पदरी मात्र निराशा; रेशन दुकानदारांना कमिशनची प्रतीक्षा; चार महिन्यांपासून दीड कोटी थकीत

कैलास खबाले, रूपेश देशमुख, पोलिस पाटील प्रभाकर कांबळे उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मानाचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. तसेच त्यांना बदाम, खजूर, राजगिरा लाडू, केळी, सफरचंद अशा पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास राहुल देशमुख, बाळू तांबोळी, राहुल जाधव, गणेश पळसे, प्रतीक ताटे, अजित गांधी, मयूर उंबरदंड, अशोक गुरव, बाबूराव नागणे, धीरज जाधव, यल्लाप्पा तेलंग, डॉ. प्रशांत देशमुख, अविनाश साळुंखे, आकाश शिंदे, दीपक नागणे, अतुल कांबळे, प्रताप नागणे, लक्ष्मण कांबळे, अजय नागणे, महेश नागणे, सचिन आसबे, प्रजय नागणे, शशिकांत आसबे, ओंकार धोकटे, सचिन नागणे, ओंकार लवटे, ओंकार ठिगळे, मुकुंद देशमुख, अप्पा सरक, सोहेल जमादार यांच्यासह विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

solapur
Solapur : टेंभू योजेनेचा कॅनॉल फुटून लाखो लिटर पाणी वाया; सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील घटना; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

‘सकाळ’मधील बातम्या आणि लेख दर्जेदार समाजमन निर्माण करण्याचे काम करतात. मी स्वतः ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीचा नियमित वाचक आहे. ‘तंदुरुस्त बंदोबस्त’सारख्या उपक्रमांमधून समाज आणि पोलिस यांमधील दरी कमी होऊन शांतता प्रस्थापित करण्याचे मोठे काम होण्यास मदत होत आहे.

अनंत कुलकर्णी, पोलिस निरीक्षक,

सांगोला पोलिस स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.