Solapur : आ.यशवंत माने आणि राजन पाटील यांचा मोहोळची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट - रमेश बारसकर

भारतीय जनता पक्षाचे नेते पत्रकार परिषद घेऊन शहरातील नागरिकांची दिशाभूल करत आहेत.
solapur
solapursakal
Updated on

मोहोळ - मोहोळच्या दुय्यम निबंधक कार्यालयाची विभागणी करून ते अनगर येथे मंजूर करीत माजी आमदार राजन पाटील आणि आमदार यशवंत माने यांनी मोहोळची बाजारपेठ उध्वस्त करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप करीत, येणाऱ्या सर्वच निवडणुकीत तालुक्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे प्रतिपादन मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले.

मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचे विभाजन करून ते अनगर येथे केल्याच्या निषेधार्थ ज्योतीक्रांती परिषदेच्या वतीने रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बारसकर म्हणाले:येथील दुय्यम निबंध कार्यालयाची विभागणी करून सहा सप्टेंबर रोजी विशेष बाब म्हणून अनगर येथे मंजूर करण्यात आले आहे. कुठल्याही नागरिकाची कसलीही तक्रार नसताना मोहोळच्या दुय्यम निबंधक कार्यालयाची विभागणी करण्यात आली आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. हे पाप ज्या राजकीय नेत्यांनी केले आहे त्यांना मोहोळचे ग्रामदैवत सिद्धनागेश व जनता त्यांची जागा दाखवेल. या कार्यालयाची विभागणी झाल्यामुळे शहरातील छोटे व्यावसायीक, हॉटेल व्यावसायीक, टपरीधारक, टायपिस्ट, झेरॉक्स सेंटर व्यापारी, मेडिकल इत्यादीं सह अनेक व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे.

हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे देखील मोठ्या प्रमाणात हाल होणार आहेत. मोहोळ ची बाजारपेठ संपवण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच अनगरकरांनी केलेला आहे, आणि हा देखील त्याचाच एक भाग आहे. हा डाव मोहोळ शहरातील स्वाभिमानी जनतेने ओळखला पाहिजे व जोपर्यंत शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय पूर्ववत होत नाही तोपर्यंत हा लढा चालू ठेवला पाहिजे.

solapur
Solapur ganeshotsav : मंगळवेढ्यात चंद्रयाण देखावा पाहण्यास गर्दी

भारतीय जनता पक्षाचे नेते पत्रकार परिषद घेऊन शहरातील नागरिकांची दिशाभूल करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार, पालकमंत्री, महसूल मंत्री असताना अशी नौटंकी करून शहरातल्या नागरिकाची दिशाभूल करीत असल्याचा आरोप मंगेश पांढरे यांनी केला.

solapur
Solapur News : म्हैसाळच्या पाण्यासाठी गावागावात भांडण;पाण्याचे आवर्तन घेण्यासाठी मारामारी

यावेळी विठाबाई बारसकर, क्षमाताई बारसकर, संगीता पवार, अतुल क्षीरसागर,शीलवंत क्षीरसागर, जितेंद्र अष्टुळ,मंगेश पांढरे,सागर अष्टुळ, रियाज शेख,तनवीर शेख,उमेश गोटे, सुलतान पटेल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.