Solapur : कामानिमित्त घरी येणारा तरुणच निघाला चोरटा; १२ तोळे दागिने हस्तगत

त्याने कपाटातील १४.०२ तोळे दागिने लंपास केले होते.
crime
crimesakal
Updated on

सोलापूर - पती-पत्नी नोकरीला, मुलगा नातेवाइकांकडे असायचा आणि मल्हारी दत्तु मस्के (रा. बुधवार पेठ, मिलिंद नगर) यांचे घर बंद असायचे. त्यांच्याकडे कामानिमित्त नेहमी येणाऱ्या यतिराज किशोर गायकवाड (रा. धर्मश्री लाईन, मनोहर नगर, झोपडपट्टी) यानेच मस्के यांच्या घरी चोरी केली. त्याने कपाटातील १४.०२ तोळे दागिने लंपास केले होते. या चोरीचा उलगडा करीत फौजदार चावडी पोलिसांनी १२ तोळे दागिने हस्तगत केले आहेत.

crime
Solapur Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना आजोबांने केला नातीवर अत्याचार

कामानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर ३ मे ते २५ जुलैच्या दरम्यान बनावट चावीचा वापर करून कोणीतरी कपाटातील पाच लाख ६७ हजारांचे दागिने चोरून नेल्याची बाब मस्के यांच्या लक्षात आली. त्यावेळी त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख शंकर धायगुडे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस हवालदार रवींद्र परबत, प्रवीण चुंगे, पोलिस नाईक आयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड,

कृष्णा बडुरे, विनोद व्हटकर, नितीन मोरे, सचिनकुमार लवटे, अजय पठाण, अमोल खरटमल, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे, तोसिफ शेख यांच्या पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास केला. पहिल्यांदाच रेकार्डवर आलेल्या यतिराजवर कोणीही संशय घेतला नव्हता.

crime
Solapur news : उद्योग-व्यवसायातून महिलांनी स्वतःचा विकास करावा; डॉ. नभा काकडे

पण, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली आणि चोरीचे दागिने विक्रीसाठी जाताना पोलिसांना त्याला ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चार लाख ७६ हजार रुपयांचे दागिने हस्तगत केले असून उर्वरित दोन तोळे दागिन्यांचा शोध सुरु आहे.

crime
Solapur Crime : विवाहितेचा छळ करून खून; रेल्वे स्टेशनवर आढळला मृतदेह, 'तिच्या'जवळ होती चिठ्ठी!

दुसऱ्याच दिवशी दागिने विकायला गेला अन्...

संशयित आरोपी यतिराज किशोर गायकवाड (वय २५) हा पहिल्यांदाच पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. कामधंदा न करता त्याला मद्यपानाची सवय असल्याचे पोलिसांनी सांगितले.

चोरीच्या दुसऱ्याच दिवशी (२७ जुलै) यतिराज चोरीचे दागिने विक्रीसाठी मधला मारुती परिसरातील सोनार गल्लीकडे निघाला होता. पोलिसांना पाहताच तो पळून जात असताना त्यावेळी पोलिसांनी त्याला बाळीवेस परिसरातील हॉटेल अनससमोरून ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.