सोलापूर : २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील १४ हजार ७८३ शाळांमध्ये आता प्रत्येकी एक सेवानिवृत्त शिक्षक (७० वर्षांची वयोमर्यादा) किंवा डीएड-बीएडधारक तरुणाची नेमणूक केली जाणार आहे. शासनाच्या या नव्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील तेवढी पदे कायमचीच संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.