Solapur Crime : जीवे मारण्याची धमकी देऊन मित्राकडूनच उकळले दहा लाख

संशयित आरोपी अटकेत, दहावीतील अल्पवयीन मुलगा बाल न्यायमंडळात
solpaur crime update friend theft 10 lakh rs from friend crime police
solpaur crime update friend theft 10 lakh rs from friend crime police sakal
Updated on

सोलापूर : नववीतील मुलाचा इयत्ता दहावीत शिकणारा एक मित्र होता. मित्राच्या घरात पैसे असल्याची खबर लागताच दहावीतील मित्राने जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल दहा लाख रुपये उकळले.

त्यात अल्पवयीन संशयित मुलाच्या भावजीने त्याला साथ दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. जोडभावी पेठ पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून आकाश खाडे याला अटक केली आहे. तर अल्पवयीन मुलाला बाल न्यायमंडळासमोर हजर केले आहे.

संशयित अल्पवयीन आरोपी आणि फिर्यादीचा मुलगा एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादीच्या घरात ११ लाख २५ हजार रुपयांची रोकड होती. त्यांचा मुलगा अधूनमधून त्यातील पैसे काढून घेत होता.

solpaur crime update friend theft 10 lakh rs from friend crime police
Solapur : आ.अवताडेंच्या गाव भेट दोंऱ्यात प्रमुख अधिकाऱ्यांची दांडी; कारवाईच्या सुचना

डिसेंबर २०२२ रोजी ठेवलेले कपाटातील पैसे फिर्यादीने एप्रिल २०२३ मध्ये म्हणजेच पाच महिन्यांनी पाहिले. त्यावेळी कपाटात अवघे एक लाख रुपयेच शिल्लक राहिले होते. त्यानंतर त्यांनी विश्वासाने मुलाकडे विचारपूस केली.

त्यावेळी फिर्यादीच्या मुलाने संपूर्ण हकिगत कथन केली. त्यानंतर विचारविनिमय करून इरावती शिवशंकर सिडगिद्दी यांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते यांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

solpaur crime update friend theft 10 lakh rs from friend crime police
Solapur : गरीब कुटुंबातील चिमुकल्यांच्या नशिबी एकच गणवेश

एक संशयित आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायमंडळासमोर हजर केले. तर आकाश खाडे याला जेरबंद करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

चार महिन्यांनी आई-वडिलांना समजले

फिर्यादी इरावती सिडगिद्दी यांनी कामानिमित्त बॅंकेतून काढलेले जवळपास सव्वाअकरा लाख रुपये डिसेंबर २०२२ रोजी घरातील कपाटात ठेवले होते. पाच महिन्यानंतर (एप्रिल २०२३) त्यांनी कपाटात पाहिले, त्यावेळी कपाटातील दहा लाख रुपये गायब होते.

त्यांनी चौकशी केली, त्यावेळी आपल्या मुलाच्याच मित्राने व त्याच्या भावजीने ते पैसे जीवे मारण्याची धमकी देऊन उकळल्याची बाब समोर आली. संशयितांनी त्या मुलासह त्याच्या आई-वडिलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. घाबरून त्याने पैसे संशयितांना दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.