सोलापूर : नऊ नगरपरिषदांवर प्रशासकाची नियुक्ती

राज्यातील कोरोना स्थिती पाहता जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले आहेत.
Municipality
MunicipalitySakal
Updated on

सोलापूर : राज्यातील कोरोना स्थिती (Corona Update) पाहता जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी काढले आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) कोविडच्या स्थितीमुळे निवडणूका अशक्‍य असल्याने राज्य शासनाला (State Government) या नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्याची सुचना केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एकूण 9 नगरपरिषदेचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. त्यामुळे या नगरपरिषदांच्या निवडणूका घेण्याची जय्यत तयारी सुरु झाली होती. सर्वच राजकीय पक्षांनी देखील निवडणुक लढवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली होती.

Municipality
MPSC EXAM : कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

कोविडनंतर आता ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेत या नगरपरिषदांच्या निवडणुका घेणे धोकादायक ठरले होते. तसेच या सार्वत्रिक निवडणुका घेण्यास कालावधी लागण्याची शक्‍यता होती. त्यामुळे निवडणूक घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला या नगरपरिषदांवर प्रशासक नेमावेत असे कळवले. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी या बाबत आदेश काढून जिल्ह्यातील 9 नगरपरिषदांवर प्रशासकांची नियुक्ती केली आहे.

यामध्ये बार्शी, पंढरपूर, करमाळा, कुर्डूवाडी, मैंदर्गी, मंगळवेढा नगरपरिषदेवर प्रशासक म्हणून उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सांगोला नगरपरिषदेवर तहसीलदारांची प्रशासकपदी नियुक्ती झाली आहे. दुधणी व अक्कलकोट नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून तेथील मुख्याधिकारी काम पाहतील असे नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी आदेशात म्हंटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.