एफआरपीसाठी रयत क्रांती संघटनेने वेधले भजन आंदोलनाने लक्ष

या भजन आंदोलनला विठ्ठल पावणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमधे चर्चा सुरू आहे.
भजन आंदोलनाने लक्ष
भजन आंदोलनाने लक्षsakal
Updated on

माढा, (जिल्हा - सोलापूर ) : उसाला एकरकमी भाव व थकीत एफआरपीसाठी हातात टाळ व मृदुंग घेत भजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माढा तहसिल कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असून या भजन आंदोलनला विठ्ठल पावणार की नाही याबाबत शेतकऱ्यांमधे चर्चा सुरू आहे.

तालुक्यातील कारखान्यांनी‌ 2021-22 या गळीत हंगाममधील ऊसाचा दर एकरकमी जाहीर करावा. मागील थकीत एफआरपीची रक्कम घटस्थापनेपूर्वी द्यावी. तसेच कारखान्यांनी प्रशासकीय खर्च कमी करावा, सामाजिक ऊपक्रम, शेतकरी मेळाव्यावरील खर्च कमी केला‌ तर एफआरपी देता येऊ शकेल. याबाबत ‌कारखान्यांनी सकारात्मक रहावे. अन्यथा संघटना उग्र आंदोलन करेल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे जिल्हासंपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील यांनी दिला.

भजन आंदोलनाने लक्ष
बुलडाणा : खडकपूर्णाचे १९ दरवाजे एक मीटरने उघडले

राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्व कारखानदारांनी शेतकऱ्यांना एकरकमी हमीभाव दिला पाहीजे. शेतकरी जगला तरच कारखानदारी टिकणार आहे. यामुळे साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना आदा केली पाहिजे.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात, जिल्हापाध्यक्ष बाळकृष्ण बोबडे, जिल्हापाध्यक्ष नंदकुमार लादे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष अण्णा जाधव, शेतकरी नेते विठ्ठल मस्के, तालुकाध्यक्ष विशाल इंदलकर, मोहोळ तालुका कार्याध्यक्ष हनुमंत गिरी, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष दिगंबर ननावरे, शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष सागर निर्मळ, माढा तालुका बांधकाम कामगार संघटना तालुकाध्यक्ष संजीव शिंदे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सुनील पाटील, विक्रम शेळके, माढा तालुका संघटक आप्पा गवळी, तालुकापाध्यक्ष अमोल गवळी, तालुका संघटक प्रशांत कराळे, प्रमोद गायकवाड, कुंदन वजाळे, विक्रम शेळके, तांदुळवाडीचे माजी उपसरपंच राजेंद्र शिंदे, प्रदीप कदम, शंकर साठे, पप्पू बोराटे व शेतकरी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील पाटील यांनी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनात सहभाग नोंदवित पाठिंबा दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()