Solapur News : चालू रब्बी हंगामात मोहोळ तालुक्यातील विविध चार कृषी मंडळातील शेतकऱ्यांनी नशिबावर हवाला ठेवून काळया आईची ओटी भरली आहे. त्यात 17 हजार 471 हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, मका, गहू, हरभरा यांची पेरणी केली आहे. 2 हजार 498 हेक्टर क्षेत्रावर विविध चारा पिकांची तर 2 हजार 364 हेक्टर क्षेत्रावर विविध भाजीपाला पिकांची लागवड केली आहे. दरम्यान बुधवारी रात्री झालेल्या पावसाने या पिकांना टवटवी आली आहे.
जुलै महिना वगळता पूर्ण पावसाळा कोरडा गेला, त्यामुळे विहिरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा जाचणार असल्याची चर्चा जुन्या जाणकार शेतकऱ्याकडून होत आहे. पुढे पाऊस पडेल या आशेवर शेतकऱ्यांनी खरीपात पेरणी केलेली तूर, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके जळून गेली.
रब्बी हंगामात ही निसर्गावर भरवसा ठेवून ज्वारी, मका, गहू, हरभऱ्याची पेरणी केली आहे. सध्या उजनी डाव्या कालव्याला पाणी सुटले आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस तोडणी टोळ्या करवी विविध कारखान्यांची ऊस तोडणी सुरू आहे. त्यामुळे ऊसाला पाणी देता येत नाही, दिलेच तर ऊस वाहतूक करणारी वाहने शेतात घुसण्याचा धोका आहे. त्यामुळे इतर पिकांना पाणी किती लागणार?
पुढच्या पावसाळ्यात कधी पाऊस पडेल याचा अंदाज नसल्याने उसाचा खोडवा ठेवता येईना, कारण कालव्याचे पाणी गेल्यावर पुन्हा 14 ते 15 महिने तो कसा सांभाळावा याची मोठी अडचण आहे. चारा महागल्याने दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे त्यामुळे एक लाखाची गाय अवघ्या 50 ते 60 हजारात विकावी लागत आहे.
पेरणी केलेले क्षेत्र पुढील प्रमाणे
ज्वारी-13 हजार 685 हेक्टर
मका- 2 हजार 682
गहू- 523
हरभरा 581
एकूण तृणधान्य- 16 हजार 890
लागवड केलेली चारा पिके
रब्बी मका- 1 हजार 652 हेक्टर
कडवळ- 759
लुसर्न घास- 31
नेपियर घास- 56
लागवड केलेली भाजीपाला पिके
कांदा- 2 हजार 109 हेक्टर
टोमॅटो- 159
वांगी- 55
दोडका- 41
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.