नवरात्रोत्सवात रात्री दहापर्यंत तर नवमीला रात्री बारापर्यंत स्पीकरला परवानगी

२६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. ४ सप्टेंबरला नवमीनिमित्त स्पीकरला (ध्वनीक्षेपकास) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.
नवरात्रोत्सव
नवरात्रोत्सवCanva
Updated on

सोलापूर : शहरात सण-उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. सोमवारपासून (ता. २६) नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होत आहे. ४ सप्टेंबरला नवमीनिमित्त स्पीकरला (ध्वनीक्षेपकास) सकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.

कोरोनानंतर दोन वर्षांनी पहिल्यांदाच नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. उत्सव साजरा करण्यावर शासनाचे कोणतेही निर्बंध सध्या लागू नाहीत. ८ ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. नवरात्रोत्सव काळात स्पीकरसाठी सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्पीकरसंदर्भात स्पष्टीकरण दिले. त्यानुसार पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी स्पीकरच्या वेळांबाबत नवे आदेश काढले आहेत. स्पीकर लावण्यासाठी परवानगी असेल, पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही, याची नवरात्रोत्सव मंडळांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. आवाजाची मर्यादा पाळावी, असेही पोलिसांनी स्पष्ट ‌केले आहे.

प्रतिष्ठापनेसाठी दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त

सोमवारी घटस्थापना होणार आहे. शांततेत व आनंदात नवरात्रोत्सव साजरा व्हावा या हेतूने शहरात तीन पोलिस उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २४ पोलिस निरीक्षक, ५० सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक हजार १६१ पोलिस अंमलदारांचा बंदोबस्त असणार आहे. शहर पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफची एक कंपनी आणि सातशे पुरुष होमगार्ड व शंभर महिला होमगार्ड असणार आहेत.

नवरोत्रोत्सवात घ्यावी अधिकृत वीज

सोलापूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी घ्यावी. तसेच उत्सव मंडळांनी उत्सवातील देखावे, मंडप, रोषणाई व वीज सुरक्षेतील त्रुटीमुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी गांभिर्याने दखल घेवून उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणने केले आहे. नवरात्रोत्सवात मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४. ७१ रुपये प्रतियुनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८.६९ रुपये, ३०१ ते ५०० प्रतीयुनिटसाठी ११.७२ रुपये आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३.२१ रुपये दराने वीजपुरवठा देण्यात येणार आहे. मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई होईल, असेही महावितरणने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.