Sakal Education Expo : विद्यार्थ्यांना मिळाली नव्या संधींची माहिती;सकाळ एज्युकेशन एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ प्रस्तुत एज्यु एक्स्पो प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन नामवंत विद्यापीठे व शैक्षणीक संस्थांच्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. ‘सकाळ’ एज्यू एक्स्पो प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस होता.
Sakal Education Expo
Sakal Education Expo sakal
Updated on

सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ प्रस्तुत एज्यु एक्स्पो प्रदर्शनास विद्यार्थी व पालकांनी भेट देऊन नामवंत विद्यापीठे व शैक्षणीक संस्थांच्या नव्या अभ्यासक्रमांची माहिती जाणून घेतली. ‘सकाळ’ एज्यू एक्स्पो प्रदर्शनाचा आजचा दुसरा दिवस होता. रविवारची सुटी असल्याने पालकांनी त्यांच्या पाल्यांसमवेत विविध स्टॉलला भेट दिली. विद्यार्थ्यांसमोर दहावी व बारावीनंतर नेमके काय करायचे या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध प्राध्यापकांशी संवाद साधून विद्यार्थी मिळवत होते. विज्ञान शाखेत पीसीएम व पीसीबी या ग्रुपच्या विद्यार्थ्यांना पुढील काळात नवे पदवी अभ्यासक्रम असावेत यावर पालकांनी चर्चा केली. अनेक स्टॉलवर असलेली माहितीपत्रके वितरित करण्यात आली.

प्रथमच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, एमआयटी विश्व प्रयाग विद्यापीठ, डी.वाय. पाटील विद्यापीठ व पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना घेता आली. विदेशातील शिक्षणाचे मार्ग काय आहेत, त्याचा खर्च काय असतो याची चौकशी पालकांनी केली. फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग, एआय, इलेक्ट्रिक व्हेईकल इंजिनिअरिंग असे नवे अभ्यासक्रम पालकांनी जाणून घेतले. तसेच अनेक नवे अभ्यासक्रम, संस्थांची वैशिष्ट्ये, प्रवेश प्रक्रिया या संबंधी माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी देखील स्टॉलवर जाऊन प्राध्यापकांशी करिअरबद्दल संवाद साधला. या प्रदर्शनात पुणे, सोलापूरसह अनेक भागातील नामवंत संस्थांचा समावेश होता.

सहभागी संस्थांची वैशिष्ट्ये

  • दत्तकला इन्स्टिट्यूट, स्वामी चिंचोली- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एकाच छताखाली इंजिनिअरिंग व फार्मसीचे शिक्षण

  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ- बीकॉम (प्रोफेशनल), फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड क्वालिटी, पेंट टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल ॲण्ड फाईन केमिकल टेक्नॉलॉजीचे नवे अभ्यासक्रम

  • पिंपरी चिंचवड विद्यापीठ- विदेशातील अनेक विद्यापीठांशी एमओयू व टायअप व यावर्षीपासून बीए (सिव्हिल सर्विसेस) अभ्यासक्रम

  • फ्युएल बिझनेस स्कूल- मुलीसाठी १०० टक्के शैक्षणीक शिष्यवृत्ती

  • सिद्धेश्वर वूमन्स इंजिनिअरिंग कॉलेज- सोलापुरात पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्स

  • भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग- यावर्षीपासून बायो मेडिकल इंजिनिअरिंग व एम.सी.ए. अभ्यासक्रम

  • अलीफ ओव्हरसीज एज्युकेशन- विदेशातील ५०० विद्यापीठात विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी

  • नागेश करजगी ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेज- एआय ॲड डेटा सायन्स व एमटेक (ईव्हेईकल) कोर्स उपलब्ध

  • डी.वाय. पाटील विद्यापीठ- नॅसकॉमचे सर्टिफाईड कोर्सेस नियमित कोर्सेससह उपलब्ध

  • एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ- एलकेजी टू पीजी शिक्षण, १०० टक्के प्लेसमेंट व रेल्वे इंजिनिअरिंगचे शिक्षण

  • व्ही.व्ही.पी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग- पॉलिटेक्नीकला एआय व मशिन लर्निंग पदविका शिक्षण उपलब्ध

  • अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट- बी.बी.ए.व बीसीए मध्ये व्हॅल्यू ॲडेड व स्कील ओरिएंटेड कोर्सेस

  • मेलोडी टिंचिग करिअर पॉइंट- कोटा पॅटर्ननुसार सोलापुरात नीट व जेईई तयारी

  • ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक बेलाटी- कॉम्प्युटर सायन्स व इलेक्ट्रॉनिक्सच्या जागांची वाढ

  • कॉलेज ऑफ फार्मसी- मलेशियाच्या पुत्रा विद्यापीठाशी एमओयू, प्लांट टिश्यू कल्चर, प्रोबायोटिक व मॉलिक्युलर जीनोनिम्सचे कोर्सेस

  • ए.जी.पाटील पॉलिटेक्निक- पाच कोर्सेससह संशोधन व पेटंट नोंदणीला चालना

  • एन.बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग- सिंहगड

  • पब्लिक स्कूलमध्ये शालेय शिक्षणासोबत जेईई व फाउंडेशन कोर्सेस

  • भंवर राठोर डिझाईन स्टुडीओ- डिझाईन, आर्किटेक्चर अभ्यासक्रम एन्ट्रन्स परीक्षा तयारी मार्गदर्शन

  • आयडीबीआय बॅंक- शैक्षणिक कर्जाच्या आकर्षक योजना

  • ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन- बांधकाम क्षेत्रात प्लॉट, फ्लॅट योजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.