St News: मंगळवेढा आगाराने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवसात अधिकारी, महामंडळाचे चालक व वाहक यांच्या प्रयत्नाने 11 लाख 71 हजार 734 रुपयाचे उत्पन्न मिळाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजय भोसले यांनी दिले.
दिवाळी सण आणि हुलजंती यात्रेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात येण्या जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे वाढलेल्या नागरिकांनी ये जा करण्यासाठी एसटी बसेसचा आधार घेतला आहे त्यामुळे एसटीला उत्पन्न वाढीची संधी मिळाली मंगळवेढा आगारामध्ये सध्या 60 बसेस कार्यरत असून वाहक चालक सहित 290 कर्मचारी कार्यरत आहेत.
या आगाराचे उत्पन्न मध्यंतरीच्या काळात कमी झाले होते. शासनाने एसटीचे उत्पन्न वाढावे या दृष्टिकोनातून महिला सन्मान योजना व जेष्ठ नागरिकांना मोफत बससेवा सुरू केली. यामध्ये महिलांना 50% तिकटामध्ये कुठेही प्रवास करण्याची सोय महामंडळाच्या बसेस मधून केल्यामुळे एसटीच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली.
10 नोव्हेंबर या दिवशी 21,647 किलोमीटरची वाहतूक करून सवलतीसह प्रति किलोमीटर 54.13 रुपयाचे उत्पन्न मिळवले. मंगळवेढा आगारातून सध्या पंढरपूर, सोलापूर ,सांगोला,पुणे, यासह ग्रामीण भागात प्रवाशांना सुविधा दिल्या जातात सध्या अनेक ठिकाणी लांब पल्याच्या गाड्यांची आवश्यकता आहे. सध्या महामंडळाने पंढरपूर- चडचण, मंगळवेढा- गाणगापूर ही बस सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून शासनाकडून भविष्यात ई-बस मंगळवेढा आगाराला प्राप्त झाल्यास आणखीन चांगल्या सुविधा देता येऊ शकतील अशी परिस्थिती आहे
शिवाय हुलजंती यात्रा व कार्तिकी वारीतून देखील एसटीला चांगले उत्पन्न मिळण्याची संधी आहे. आगाराचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. एस टी महामंडळाने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बस स्थानकाला लोकसहभागातून रंगरंगोटी करत बस स्थानकाचे रूप बदललेले आहे. भविष्यात लांब पल्ल्याच्या बसेस मधून आगाराला चांगले उत्पन्न मिळण्याची संधी आहे. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अध्यायावत बस मंगळवेढा आगाराला उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचे प्रवासी वर्गातून बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.