भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल

भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
Updated on
Summary

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन लाख मुलांपैकी एक लाख पाच हजार मुलांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहोचत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या दोन हजार 798 तर माध्यमिक विभागाच्या एक हजार 87 शाळा आहेत. या शाळांमध्ये सात लाख 72 हजार 386 मुले असून त्यापैकी तब्बल चार लाख 93 हजार 157 मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी (online learning) अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईलच (android mobiles) नाहीत, अशी माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील दोन लाख मुलांपैकी एक लाख पाच हजार मुलांपर्यंतच ऑनलाइन शिक्षण पोहोचत असल्याची बाब स्पष्ट झाली आहे. (students do not have android mobiles for online learning)

भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
सोलापूर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रे बंद

कोरोना काळात "शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरू' या उपक्रमाअंतर्गत मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविले जात आहे. त्याशिवाय गृहभेटी, स्वाध्याय उपक्रमही सुरू आहेत. तसेच सह्याद्री वाहिनीवरून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मात्र, जिल्हा परिषदेसह माध्यमिक शाळांमधील परिस्थिती वेगळी असल्याचे समोर आले आहे.

भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
सोलापूर विद्यापीठाची 5 जुलैपासून परीक्षा

जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये दोन लाखांहून अधिक मुले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांच्या पालकांकडेच अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल आहेत. शिक्षण विभागाच्या सर्व्हेनुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 97 हजार 426 मुलांच्या पालकांकडे अ‍ॅन्ड्रॉइड साधने नाहीत, ही बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा, खासगी प्राथमिक, माध्यमिक, अनुदानित व विनाअनुदानित माध्यमिक शाळांमधील 70 टक्‍क्‍यांहून अधिक मुलांच्या पालकांकडेही मोबाईल नाहीत.

गटशिक्षणाधिकारी विस्ताराधिकारी, केंद्रप्रमुखांनी ऑनलाइन शिक्षण सुरळीत चालू आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी शाळांना अचानकपणे भेटी द्याव्यात, असे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दुसरीकडे कोरोनामुक्‍त गावांमध्ये अशा विद्यार्थ्यांची ऑफलाइन शाळा व गृहभेटी सुरू करण्याचेही निर्देश प्रशासनाने दिले आहेत. त्यावेळी कोरोनासंबंधीचे सर्व नियम तंतोतंत पालन करणे शिक्षकांना बंधनकारक असेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
सोलापूर राष्ट्रीय महामार्गांवर शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन;पाहा व्हिडिओ

ज्या मुलांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल नाहीत, त्यांच्यासाठी प्लॅन बी तयार केला आहे. शिक्षकांच्या माध्यमातून त्या मुलांपर्यंत पोहोचून स्वाध्याय दिला जात आहे. मुलांमधील शिक्षणाची गोडी कमी होऊ नये म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.

- संजयकुमार राठोड, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

भवितव्य अंधारात! पाच लाख विद्यार्थ्यांकडे नाहीत मोबाईल
सोलापूर आगारातून केवळ तीन रातराणीच्या फे-या सुरु

----------------------------------------------------------------------

अ‍ॅन्ड्रॉइड मोबाईल नसलेले विद्यार्थी

-------------------------------------------------------------------

तालुका... एकूण विद्यार्थी... मोबाईल नसलेले

---------------------------------------------------------------------

अक्‍कलकोट... 22,050... 13,671

बार्शी ... 12,970... 6,354

करमाळा... 15,167... 7,736

माढा... 19,660... 10,027

माळशिरस... 27,360... 12,770

मंगळवेढा... 13,233... 5,293

मोहोळ... 20,589... 10,081

पंढरपूर... 22,254... 7,714

सांगोला... 19,968... 10,173

द. सोलापूर... 19,600... 8,954

उत्तर सोलापूर.... 8,937... 4,647

--------------------------------------------------------

एकूण विद्यार्थी... 2,01,792... 97,426

---------------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.