सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. परंतु सध्या महाराष्ट्रात एमपीएससी परीक्षेच्या निर्णयासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये आणि एमपीएससी आयोगामध्ये समन्वय नसल्याचे चित्र वेळोवेळी पाहावयास मिळत आहे. वर्षानुवर्षे केलेली मेहनत वाया जाणार का? आणि एमपीएससी परीक्षा ठरलेल्या वेळात पुन्हा होणार का? गेल्या वर्षी राज्य सेवा परीक्षेतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तिपत्र दिले जाणार का? असे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत.
मागील आठवड्यात कोरोना या रोगामुळे सामूहिक जमावबंदीचे कारण सांगत सरकारने राज्य सेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विद्यार्थ्यांमधील असंतोष पाहून त्यांना तो निर्णय पुन्हा मागे घ्यावा लागला. नुकतीच विद्यार्थ्यांनी ऑनलाइन हॅश टॅगची मोहीम सुरू केली असल्याने सध्या ट्विटरवर या मोहिमेला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. परंतु प्रत्येक वेळी विद्यार्थ्यांनी राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करावा की हक्कांसाठी लढा द्यावा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
दरम्यान, महापरीक्षा पोर्टलमार्फत 36 हजार पदांसाठी अंदाजे 12 ते 13 लाख लोकांनी अर्ज केले होते. एकूण 34 लाखांपेक्षा जास्त अर्ज या पदांसाठी आलेले आहेत. परंतु पहिल्या टप्प्यातील आरोग्य विभागाच्या 3276 पदांसाठी परीक्षा पार पडली. परंतु अजूनही 33 हजार पदांसाठीची भरती शिल्लक असताना कोरोनामुळे 50 टक्के नोकर भरती धोरणामुळे 16 हजार 500 पदांसाठी परीक्षा होणार आहेत.
हॅश टॅग मोहिमेतील मागण्या...
सरकारला मुळात हेच कळले पाहिजे की जेवढा मतदारांचा प्रश्न गंभीर आहे तेवढाच एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. परंतु जर सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करू शकत नाही, त्यामुळे ही हॅशटॅग मोहीम सुरू करण्यात आली आहे.
- महेश बडे,
विद्यार्थी प्रतिनिधी, एमपीएससी स्टुडंट्स राइट्स
एमपीएससी परीक्षेसंदर्भातला हा गोंधळ गेली चार वर्षे सुरू आहे. या सर्व समस्यांचा सामना करत विद्यार्थी परीक्षांना सामोरे जात आहेत. या सर्व प्रकारात एक मार्गदर्शिका म्हणून मी जेव्हा या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया जाणून घेते तेव्हा या विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडत जात आहे, असं वाटत आहे.
- भाग्यश्री वठारे,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, यशदा, पुणे
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.